Xerox machine yojana 2024 : झेरॉक्स मशीन योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू करण्यात आलेले आहेत या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तारीख 15 जुलै 2024 आहे मागासवर्गीय महिलांना ही झेरॉक्स मशीन अनुदानावर मिळणार असून यासाठी 43 हजार 70 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे . झेरॉक्स मशीन योजना आहे 100% अनुदानावर आहे . या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत .
जिल्हा परिषदेच्या 20 टक्के उपकार अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिले जाणार आहे . सध्या ही योजना छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे प्रत्येक जिल्ह्यांना ही योजना सुरू असते फक्त अर्ज करण्याच्या कालावधीत वेगळा असतो .
झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ कोणाला मिळेल ?
Xerox machine yojana 2024 : झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ बेरोजगारांना मिळेल जर तुम्ही बेरोजगार असाल आणि रोजगार निर्माण करायचा असेल . तर ही योजना तुम्हाला हातभार लावू शकते तुम्हाला जर ऑनलाईन शॉप टाकायचे असेल तर किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी झेरॉक्स मशीन खूप गरजेचे असते . मशीन चा खर्च 43 हजार रुपये एवढा असल्याने हे मशीन घेणे परवडत नसल्याने अनेकांना आपला उद्योग उभा करण्यात अडचणी येतात परंतु आता शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषद योजनेतून हे झेरॉक्स मशीन मिळणार असल्याचे समोर येत आहे .
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर
Xerox machine yojana 2024 : झेरॉक्स योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबवली जात असून तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे .
- सादर योजना ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध या घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे .
- जरी या योजनेसाठी पात्र असाल तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे .
झेरॉक्स मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- ग्रामसेवकांच्या जागा संदर्भात प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या जातीचे प्रमाणपत्र
- तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाख रुपये पर्यंत
- अर्जदाराचा दारिद्र्यरेषेत खालील दाखला
- ग्रामसेवक यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
- योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
- शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामसभेच्या ठरावाची झेरॉक्स पत्र
- अर्जदाराचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत
- बँकेचे पासबुक
- झेरॉक्स व्यवसाय सुरू करण्यासाठी लाईट असल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला
- अर्जदाराच्या मालकीच्या जागेचा आठचा नमुना
ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . त्यांनी या कागदपत्रांची पूर्तता करून तिथे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल तसेच फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा एकदा तपासून पहावे लागेल . Xerox machine yojana 2024
घरबसल्या पाच मिनिटांमध्ये आधार कार्ड अपडेट, पहा संपूर्ण माहिती