शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर : Krushi Batami 2024

WhatsApp Group Join Now

Krushi Batami 2024महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.11 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. दिल्ली मधील हॉटेल हॉलिडे इन मध्ये पंधराव्या एग्रीकल्चर लीडरशिप मध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Krushi Batami 2024

कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now

(Krushi Batami 2024) ग्रामीण कृषी क्षेत्राच्या समृद्धीला चालना :

(Krushi Batami 2024)बांबू लागवड ,तृणधान्य, अभियान ,औष्णिक वीज निर्मिती, बायोमास चा वापर इत्यादी उपक्रम राबवलेले असून, 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प , पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशांमधील पहिले राज्य असल्याचे , सांगितले आहे. याबरोबरच 4.6 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खताचे वितरण सूक्ष्म बाजारी कार्यक्रम डाळींच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अव्वल स्थान तसेच ₹1 पिक विमा योजना राबवणारे देशांमधील एकमेव असे राज्य अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले जात आहेत. या सर्व योजनांचा परिणाम लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर ती सकारात्मक झाला असून, ग्रामीण कृषी क्षेत्रांमधील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाले आहे असे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

पुरस्कारासाठी देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती :

(Krushi Batami 2024)या परिषदेमध्ये प्रमुख भाग धारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण, ब्राझील ,अल्जेरिया, नेदरलँड, या देशांचे राजदूत तसेच महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश नागालँड इत्यादी राज्यांचे मंत्री यांची उपस्थिती असणार आहे.

बदलत्या हवामानाचे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम

आंध्र प्रदेशला पहिला पुरस्कार मिळाला होता :

2008 पासून पुरस्काराचे प्रथम सुरुवात करण्यात आली होती. कृषी क्रांतीचे प्रणेते प्राध्यापक एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार समितीने सर्वप्रथम हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला दिलेला होता.

या कृषिमंत्र्यांनी भूषवले पुरस्काराचे अध्यक्षपद :

आतापर्यंत कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण, अखिलेश यादव, प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन एम एस स्वामीनाथन, इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. स्वामीनाथन यांनी 10 वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या डॉक्टर एम जे खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. 2023 साठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, आणि 2022 साठी तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना पुरस्कार दिला होता.

राज्यातील 32 जिल्ह्यात 15 तारखेपासून पिक विमा वाटप सुरू

WhatsApp Group Join Now

Leave a Comment