विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; संपूर्ण राज्यभर पाऊस शेतकरी आनंदात : Vidarbh Havaman Andaj 2024

WhatsApp Group Join Now

Vidarbh Havaman Andaj 2024 विदर्भामध्ये विजांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. विदर्भामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे.बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब क्षेत्र शांत झाले असले तरी महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सध्या कोकण घाटमाथ्यावरती पावसाची सुरुवात झाली आहे . परंतु उर्वरित महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारचे पावसाची अजूनही अपेक्षा आहे. विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

Vidarbh Havaman Andaj 2024

रविवारी दिनांक 30 जून सकाळपर्यंत 24 तासांमध्ये कोकणच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांबरोबरच मध्य महाराष्ट्राच्या गाठ माथ्यावरील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. दुर्ग जिल्ह्यामधील कणकवली येथे सर्वात जास्त 88 मिलिमीटर पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. विदर्भातील हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. अरबी समुद्रामध्ये ढग दाटून आले असून , राज्यामध्ये सुद्धा पावसाला पोषक हवामान आहे.

WhatsApp Group Join Now

 Vidarbh Havaman Andaj 2024

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असून, झारखंड आणि परिसरा वरती समुद्रसपाटीपासून साधारणपणे 1.2 किलोमीटर उंची वरती चक्राकार वारे वाहत आहेत. मध्यप्रदेशाने परिसरा वरती चक्राकार वारे वाहण्याची स्थिती सुरू आहे. (Vidarbh Havaman Andaj 2024)

गुजरातच्या किनाऱ्यापासून ते बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून असलेला हवेचा दक्षिण उत्तर कमी दाबाचा पट्टा कायम सुरू असल्यामुळे राज्याच्या किनाऱ्यालगत ढग पुन्हा निघू लागले आहेत.

 Vidarbh Havaman Andaj 2024

कोकण मधील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याबरोबरच पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा तसेच विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

(Vidarbh Havaman Andaj 2024)देशात लवकरच मान्सून :

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दिनांक 30 जून रोजी उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या उर्वरित भागांसोबत राजस्थान हरियाणा आणि पंजाब याबरोबर आणखी काही भागांमध्ये पावसाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांमध्ये राजस्थान हरियाणा चंदिगड आणि पंजाब आणि काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्यास आवश्यक असे पोषक हवामान निर्माण झाले आहे. मोसमी वारे लवकरच देशात येणार असून देशभरामध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार रुपये

WhatsApp Group Join Now

Leave a Comment