Tirth yatra Yojana 2024 राज्यांमधील सर्व धार्मिक नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यांच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून तीर्थ दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना भारतामधील तीर्थ दर्शनासाठी मोफत अनुदान दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मामधील साठ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेचे मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शनी योजना सुरू करण्यात आली आहे. या नागरिकांना तीर्थ दर्शन योजनेचा लाभ मिळणार आहे..मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत . महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला.
Tirth yatra Yojana 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना :
बऱ्याच जणांना या धार्मिक स्थळांना भेट देणे शक्य होत नाही परंतु बऱ्याच जणांना आर्थिक दृष्ट्या परिस्थितीमुळे जाता येत नाही. अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रा माता वैष्णव देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्माचे ही मोठे तीर्थस्थळे आहेत.
ज्येष्ठ नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि कोणी सोबत नसल्यामुळे पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्र मधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशामधील प्रमुख स्थळांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थान पैकी एक स्थळांच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेगळा लाभ घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेतून दिले जाते अनुदान
Tirth yatra Yojana 2024 या खर्चा मधील कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती साधारणपणे 30 हजार रुपयांपर्यंत इतकी दिली जाणार आहे. प्रत्यक्ष प्रवास भोजन दिवस इत्यादी सर्व सुविधांचा लाभ असणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची किमान वय यासाठी 60 वर्षे किंवा त्यावरील असणे गरजेचे आहे.
Tirth yatra Yojana 2024 या योजनेसाठी पात्रता :
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे वय 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
या योजनेसाठी अपात्रता :
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दरात आहेत.
- कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागांमध्ये सरकारी कर्मचारी असेल असे नागरिक या योजनेसाठी अपात्र असतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर त्यांना अपात्र केले जाईल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे सदस्य अपात्र असतील.
- अर्जाबरोबर ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम प्रमाणपत्र सादर करावे लागेल, हे प्रमाणपत्र प्रवासाचे तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे.
- आशा बाबींच्या आधारे नागरिकांना पात्र करायचे की अपात्र हे ठरवले जाणार आहे.Mukhyamantri Tirth Yojana 2024
एका तरुण शेतकऱ्यांची कमाल..! भाजीपाला रोपे विक्रीतून लाखोंची कमाई