Soyabean Pik 2024महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये कापूस पिकांनंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन पिकामध्ये विविध रोग प्रादुर्भावामुळे बदनाम 27% पर्यंत घट निर्माण होते. या रोगांमध्ये प्रामुख्याने जमिनीतून येणारे वरील रोग वरील रोग आणि शेंगा वरील रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची परिस्थिती सध्या वेगवेगळी आहे. मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जमिनीतून होणाऱ्या रोगाचे प्रादुर्भाव जास्त असण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामानामुळे सोयाबीन पिका वरती जमिनीमधून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
सोयाबीन पिकामध्ये बांधाकुज आणि मूळ व खोडसड दिसून येतो. सोयाबीन पिक काही भागांमध्ये उगवण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागांमध्ये पेरण्या झालेल्या आहेत. या काळामध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते.
(Soyabean Pik 2024) मूळ व खोडसड रोग :
- हा रोग फॅसिललीना या बुरशीमुळे होतो
- या रोगास रोप अवस्थेमधील पीक जास्त बळी पडतात
- या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या खोडांवर ते होऊन नंतर ती मुळांपर्यंत जाते
- अन्नपुरवठा च्या कमी प्रमाणामुळे झाड सुकून जाते .या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुकलेले खोड तसेच मुळावरती बुरशीचे बीज दिसून येतात.
- या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या प्रादुर्भाव ग्रस्त मृत अवशेषांवर रोगांची बुरशी सूक्त अवस्थेमध्ये जिवंत राहते. येथून रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि बियाण्यांवर मार्फत याचा प्रसार होतो
बदलत्या हवामानाचे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम
बांधाकुज :
- या रोगाचा प्रादुर्भाव अवस्थेपासून कधीही होण्याची शक्यता
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये जमीन तसेच पाणी साचून राहत असणाऱ्या जमिनीमध्ये दिसून येतो
- या रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोपे किंवा झाडाचे मूळ व खोड यांच्या बुंध्याजवळ पांढरी बुरशीचे वाढ झालेली दिसून येते. झाडांच्या मुळांवर मोहरीच्या आकाराचे बुरशीजन्य बीजाणू दिसून येतात
- या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांची वाढ होत नाही. झाडे पूर्णपणे कोमेजून जातात.
- या रोगाचा प्रादुर्भाव पीक अवशेष आणि वाऱ्यामार्फत पसरणाऱ्या बुरशीच्या बीजाणू मार्फत होतो.
एकात्मिक व्यवस्थापन :
- या रोगांचा प्रादुर्भाव जमिनीमधून तसेच बियाणे मार्फत होतो. त्यामुळे पेरणी करण्याआधी बियाणांना बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रति किलो बियाण्यांना ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम, यानंतर Carboczine अधिक थायरम दोन ते तीन ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी लागते.
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. शेतामधील काडीकचरा गोळा करून नष्ट करणे गरजेचे आहे.
- पेरणी करण्याआधी जमिनीमध्ये निंबोळी ढेप किंवा सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
- सोयाबीन पिकांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा आहे जैविक बुरशीनाशक 20 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये जमीन ओली असताना जमिनीमध्ये मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असेल तर रासायनिक बुरशीनाशक Carbendazim एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये याप्रमाणे फवारणी करावी.Soyabean Pik 2024
राज्यातील 32 जिल्ह्यात 15 तारखेपासून पिक विमा वाटप सुरू