PM Matru Vandana Yojana 2024 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत महिलांकडून 02 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत 18 जून ते ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत या कालावधीमध्ये लाभार्थ्यांमध्ये विशेष मोहीम राबवून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
PM Matru Vandana Yojana 2024 या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिला लाभार्थी महिलांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे प्रयत्न सुरू आहे. माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला आणि बालकल्याण विभाग नवी दिल्ली द्वारे 18 जून ते दोन ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त महिलांना पात्र लाभ देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यामध्ये 9 ऑक्टोंबर 2024 रोजी लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना आतापर्यंत लाभ देण्यात आले आहेत या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यामधील आशा वर्कर आणि आरोग्य सेविका मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रामध्ये ऑनलाईन फॉर्म प्रक्रिया सुरू झाली आहे.
कांदा चाळ योजनेअंतर्गत मिळत आहे 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान
PM Matru Vandana Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- बाह्य रुपी तपासणी कार्ड
- बँक पासबुक
- वार्षिक उत्पन्न
PM Matru Vandana Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने सेवा केंद्राच्या माध्यमातून आपला अर्ज सादर करू शकता. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असे सांगितल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्याला या योजनेसाठी लाभ मिळू शकतो. योजनेसाठी पात्र झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये पैशाचे वितरण केले जाणार आहे पहिला टप्पा 5000 रुपयांचा असेल आणि दुसरा टप्पा 6000 रुपयांचा असणार आहे.
गोपाल रत्न पुरस्कारातून पशुपालकांना त्यांच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस