Pik Vima Yojana 20242016 पासून पीक विमा योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये कंपन्यांची मनमानी कारभार असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. या योजनेअंतर्गत आंध्रप्रदेश तेलंगणा झारखंड हे राज्य बाहेर पडलेले आहेत आणि यानंतर पश्चिम बंगालआणि बिहार हे राज्य पंतप्रधान पिक विमा योजनेमधून बाहेर पडले आहेत. पिक विमा योजना मधून बाहेर पडलेल्या राज्य यांनी राज्य विमा योजना राबवत आहेत. ही योजना महाराष्ट्र मध्ये राबवावी अशी मागणी केली जात आहे.
(Pik Vima Yojana 2024) पिक विमा योजना :
Pik Vima Yojana 2024पिक विमा योजनेमध्ये कंपन्यांना राज्य हिस्सा, केंद्र हिस्सा दिल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पिकांचे नुकसान कितीही मोठे असले तरी नुकसान भरपाई अल्प प्रमाणात दिली जाते. अशी तक्रार विरोधक तसेच शेतकऱ्यांकडून सरकारला केली होती.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22000 रुपये नुकसान भरपाई, जिल्हा अनुसार अनुदान पहा
या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी पर्याय म्हणून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. ही समिती योजनेमधून बाहेर पडलेल्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करणार आहे. पिक विमा योजना मधून बाहेर पडलेल्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाते. याबद्दल त्या राज्यातील शेतकऱ्यांचे मत जाणून आणि इतर अभ्यास करून ही माहिती राज्य सरकारला दिली जाणार आहे.(Pik Vima Yojana 2024)
दूध अनुदान लवकर मिळणार.. माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल