खरीप हंगामासाठी मिळणार एक रुपयांमध्ये पिक विमा, असा करा अर्ज : Pik Vima Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2024 प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता एक रुपयांमध्ये पिक विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतलेला होता. मागील वर्षी 2023 मध्ये राज्यातील एक कोटी सत्तर लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे.

Pik Vima Yojana 2024

शेतकऱ्यांचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असते शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान पासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. 2024 मध्ये खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाने पिक विमा योजनेचे पोर्टल सुरू केलेले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया भरून आपल्या पिकांचा विमा घ्यावा असे आवाहन केले जात आहे.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2024 योजना वैशिष्ट्ये आणि नियम :

  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तुर, मूग, उडीद, सोयाबीन तसेच भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा इत्यादी पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • अधिसूचित क्षेत्रामध्ये किंवा अधिसूचित पिके घेणारे ( कुळाने अगर भाडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह ) शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी भाग घेण्यास पात्र असणार आहेत.
  • पीक कर्ज घेणार शेतकरी आणि बिगर कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऐच्छिक राहतील
  • तसेच भाड्याने शेती घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा पोर्टल वरती नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे गरजेचे आहे
  • E पिक पाहणी शेतकऱ्यांनी लागवड केल्या असलेल्या पिकांची नोंद E पिक पाहणी मध्ये करणे आवश्यक आहे.
  • आपल्या मालकीची जमीन नसलेल्या ठिकाणी जमिनीवरती विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद अशा जमिनी वरती विमा काढला असल्यास याबद्दल अत्यंत गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे.
  • या योजनेमध्ये आपण जे शेतामध्ये पीक लावलेले आहे त्याचा पिक विमा घ्यायचा आहे. शेतामध्ये जर पिक विमा घेतलेली पिक नसेल तर अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा नुकसान भरपाई योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • तसेच या वर्षांमध्ये भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवत असताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनासाठी 40% भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनासाठी 60 टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज करत असताना आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधील पिक विम्यातील अर्ज हा आधार कार्ड वरती असलेल्या नावाप्रमाणेच असणे गरजेचे आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधील पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या असलेल्या विमा पोर्टल द्वारे संलग्न बँक खात्यामध्ये करता येणार आहे. त्यासाठी आपले बँक खाते आधार नंबरशी संलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत असणे बंधनकारक आहे. यासाठी देऊ शकतोआपला बँक मॅनेजर अधिक माहिती.
  • यामुळे आधार कार्ड वरील नाव आणि बँक खात्यावर असलेले नाव हे सारखे असणे गरजेचे आहे
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी सीएससी विभागाला रुपये 40 एवढे मानधन केंद्र शासनाने निश्चित करून दिले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे बंधनकारक आहे

Pik Vima Yojana 2024

पिकविमा संरक्षित रक्कम
भात40,000 ते 51,760
ज्वारी20,000 ते 32,500
बाजरी18,000 ते 33,913
नाचणी13,750 ते 20,000
मक्का6,000 ते 35,598
तूर25,000 ते 36,802
मूग20,000 ते 25,817
उडीद20,000 ते 26,025
भुईमूग29,000 ते 42,917
सोयाबीन31,250 ते 57,267
तीळ22,000 ते 25,000
कारळे13,750
कापूस23,000 ते 59,983
कांदा46,000 ते 81,422

Pik Vima Yojana 2024

प्रधानमंत्री पिक विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत :

  • पिकांच्या पेरणीपासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनामध्ये होणारी घट
  • पिकांची पेरणी करण्याआधी व लावणी पूर्व झालेले नुकसान
  • हंगामामध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांमुळे किंवा परिस्थितीमुळे झालेले नुकसान
  • पिके काढण्याच्या आधी झालेले नुकसान
  • तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकांचे नुकसान

पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे

Pik Vima Yojana 2024 अधिसूचित क्षेत्रामध्ये तसेच अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये सहभाग घेण्यासाठी बंधनकारक नाही. परंतु यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये भाग घेण्याच्या अंतिम तारीख आधी किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळवणे आवश्यक आहे

तसेच इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा आपला सातबारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणी बद्दल स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेमध्ये किंवा कॉमन सर्विस सेंटर यांच्या मदतीने आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो किंवा या पोर्टलचे सहाय्यक घेऊ शकतो

Pik Vima Yojana 2024 योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 आहे

या योजनेबद्दल अधिक मिळवण्यासाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन 14447 संबंधित पिक विमा स्थानिक कृषी विभाग कार्यालयाची साधावा

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी !! महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता,हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्दिष्ट

  • प्रधानमंत्री पिक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे.
  • ज्यामुळे शेतकऱ्यांना नवीन आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहित केल्याने त्यांचे उत्पन्न वाढू शकेल
  • त्यामुळे त्यांच्या शेतीच्या कामकाजाची स्थिरता वाढेल आणि सातत्य सुनिश्चित राहण्यास मदत होईल
  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पीक नुकसान पिकांच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांना विविध रक्कम दिले जाते
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • अर्ज करणारे शेतकऱ्याचे मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सातबारा आणि आठ अ प्रमाणपत्र
  • त्यादिवशी शेतकऱ्याने पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे त्यासंबंधी तारीख
  • शेतामध्ये पीक पेरणी केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे
  • बँक खात्याबद्दल संपूर्ण माहिती

Pik Vima Yojana 2024 अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल
  • होम पेज वरती तुम्हाला फार्मर कॉर्नर ऑफलाइन फोर क्रोप पर्याय दिसेल
  • यानंतर शेतकरी अर्जाचे पृष्ठ पेज तुमच्यासमोर ओपन होईल
  • या पेज वरती तुम्हाला गेस्ट फार्मर पर्याय निवडणे आवश्यक आहे
  • या वरती क्लिक करतात तुमचा नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर येईल
  • यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल
  • निवासी माहिती शेतकरी माहिती
  • शेतकरी ओळखपत्र तसेच खाते माहिती
  • हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही खाली दाखवल्याप्रमाणे कॅपचा कोड एंटर करणे आवश्यक आहे
  • यानंतर तुम्हाला सबमिट पर्याय वरती क्लिक करावे लागेल
  • अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.

खरीप पिक विमा अंतर्गत अर्ज करण्यासाठी पिक विमा योजनेच्या वेबसाईट ला भेट द्या : https://www.pmfby.gov.in/

Pik Vima Yojana 2024 पिक विमा योजने बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Marathi Support

FAQ

पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • अर्ज करणारे शेतकऱ्याचे मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सातबारा आणि आठ अ प्रमाणपत्र
  • त्यादिवशी शेतकऱ्याने पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे त्यासंबंधी तारीख
  • शेतामध्ये पीक पेरणी केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे
  • बँक खात्याबद्दल संपूर्ण माहिती

पिक विमा योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

प्रधानमंत्री पिक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे.

पिक विमा योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

सर्वप्रथम प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल

WhatsApp Group Join Now

Leave a Comment