Pik Vima Bharpai 2024 नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 2023 24 च्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांची विमा रक्कम खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. येणाऱ्या 21 ऑगस्ट पूर्वी ही रक्कम खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
Pik Vima Bharpai 2024 कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी सांगितले होते. केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाते या योजनेद्वारे शेतकरी आपल्या शेताचा पीक काढत असतात. दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामात सहभागी झालेले शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा मुंडे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यामधील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पीक विमा देय असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार आहे त्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, यांच्यासह मुंबई जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यामधील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे आणि उत्पन्नात आलेले घट या आधारे देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली आहे. यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश केले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये महिन्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Pik Vima Bharpai 2024 आंदोलनाला यश :
पिक विमा ची थकीत रक्कम न दिल्यामुळे मागील आठवड्यामध्ये आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी नाशिक जिल्ह्यामधील सातपूर आयटीआय जवळील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता. शेतकऱ्यांसह संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते परंतु कृषी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे आंदोलनाचे रूपांतर बैठकीमध्ये झाले. त्यानंतर आज मुंडे यांनी थेट पैसे मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
कपाशी दर्श अमावस्या फवारणी पातीगळ व कीड नियंत्रण