Pik Vima Arj 2024 15 जुलैनंतर शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे नाशिक तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यायचे आहे. या योजनेसाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन भात मूग उडीद भुईमूग मका या पिकांचे नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. फक्त ₹1 भरून या योजनेमध्ये नोंदणी करता येणार आहे. खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती उत्पादनामध्ये होणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पिके काढणीच्या वेळी नुकसान या सर्व गोष्टींपासून पिकांना विमा दिले जाणार आहे. हा पिक विमा सेतू केंद्रावर भरायचा आहे. पिक विमा भरत असताना एक रुपये पेक्षा अधिक रक्कम देऊ नये.
या योजनेमध्ये पिकानुसार सोयाबीन प्रती हेक्टर रक्कम भात प्रति हेक्टर रक्कम, भुईमूग प्रती हेक्टर रक्कम, सोयाबीन प्रति हेक्टर रक्कम, इतकी रक्कम संरक्षित केली जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये या योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 15 जुलै 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पिक विमा भरायचा आहे.
Pik Vima Arj 2024 शेवटचे पाच दिवस :
खरीप हंगामातील पिक विमा अर्ज भरण्यासाठी 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा लवकर उतरून घ्यायचा आहे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. सामायिक सुविधा केंद्र अंतर्गत विमा अर्ज भरले जात असून अर्ज भरत असताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया शुल्क देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा आठ उतारा आणि इतर कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे, असे तालुका पाटील यांनी सांगितले आहे.
गाय गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपये अनुदान
पिक विमा अर्ज करण्यासाठी पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://pmfby.gov.in/