22 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू , शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14700 होणार रुपये जमा : Pik Vima 2024

WhatsApp Group Join Now

Pik Vima 2024महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही एक महत्वपूर्ण आर्थिक सुरक्षा देणारी योजना आहे. हवामाना मधील अनिश्चितता दुष्काळ अतिवृष्टी या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सरकारने कार्यरत केलेली आहे. 2023 मध्ये राज्य सरकारने नवीन दिशा दिली होती जी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक ठरणार आहे.

Pik Vima 2024

2023 पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये :

  • 2023 मध्ये खरीप हंगामासाठी महाराष्ट्र सरकारने 14 महत्त्वाचे पीक असणाऱ्या विभागाचे संरक्षण शेतकऱ्यांना दिलेले होते. यामध्ये ज्वारी नाचणी मूग उडीद कांदा तूर कारले सोयाबीन कापूस तीळ इत्यादी पिकांचा समावेश आहे. प्रत्येक भागातील वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा विचार केला आहे.
  • राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा परवडणारा असा केलेला आहे. शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून आपल्या पिकांचा विमा उतरवता येणार आहे. उर्वरित रक्कम सरकार विमा कंपन्यांना देते. या धोरणामुळे 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पिक विमा उतरवला आहे.
  • दुष्काळग्रस्त असणाऱ्या जिल्ह्यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे ज्या भागांमध्ये शेतीला सर्वाधिक धोका निर्माण होतो त्या भागातील शेतकऱ्यांना विशेष लाभ दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now

Pik Vima 2024 विमा वाटपाची प्रक्रिया :

  • राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना उर्वरित हप्ता वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे 2023 च्या खरीप हंगामाकरिता पीक विम्याचे वाटप लवकरच सुरू केले जाणार आहे. परंतु या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
  • जिल्ह्याप्रमाणे वाटप : साधारणपणे 24 जिल्ह्यांपैकी सात जिल्हा ना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे. राहिलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप केले जाणार आहे.
  • पात्र असणारे महसूल मंडळे : सर्व पात्र जिल्ह्यामधील ठराविक महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा दिला जाणार आहे. उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यामधील 92 महसूल मंडळांमध्ये खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना विमा दिला जाणार आहे.
  • मागील थकबाकी : मागील वर्षांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले होते, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही विमा रक्कम मिळालेली नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पीक कापणीच्या अंतिम अहवालाप्रमाणे मंजूर झालेला विमा ही वाटप केलेला नाही. या सर्व थकबाकीचे निराकारण करणे आवश्यक आहे.Pik Vima 2024

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • शेतकऱ्यांनी पीक विमा नवीन यादी जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक कृषी कार्यालय किंवा सरकारी वेबसाईट वरती उपलब्ध असलेली माहिती तपासणी आवश्यक आहे.
  • विमा रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये सातबारा उतारा पेरणी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक इत्यादींचा समावेश असतो.
  • आपल्या भागामध्ये पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी बद्दल स्थानिक कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक अशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
  • पिक विमा रक्कम मिळाली नसेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर विहित मार्गाने तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय किंवा राज्य शासनाच्या हेल्पलाइन नंबर चा वापर करावा.Pik Vima 2024

जिल्हापरिषदे कडून आता मिळणार मोफत झेरॉक्स मशीन

शेतकऱ्यांसाठी भविष्यातील आव्हाने आणि संधी : (Pik Vima 2024)

  • पिक विमा रकमेचे वेळेवरती वाटप करणे हे सर्वात मोठे आवाहन आहे. मागील काही वर्षांमध्ये याबद्दल अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी वेळेमध्ये पिक विमा रक्कम मिळणे गरजेचे आहे.
  • विमा रक्कम ठरवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर उदाहरणार्थ सॅटॅलाइट, इमेजरी ड्रोन सर्वेक्षण इत्यादींचा वापर करावा.
  • बरेच शेतकऱ्यांना अजूनही या योजनेबद्दल सर्व माहिती मिळाली नाही. त्यामुळे व्यापक प्रसार आणि शिक्षण मोहीम राबवणे गरजेचे आहे.
  • विमा कंपन्यांनी अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समजून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
  • पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
  • शासनाने विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय असेल तर ही योजना निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरू शकते.

विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

WhatsApp Group Join Now

Leave a Comment