Namo Shetkari 4th Installment 2024 आज आपण आपल्या या लेखांमध्ये नमो शेतकरी योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे व किती मिळणार आहे, आणि नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करावी, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर, आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Namo Shetkari 4th Installment 2024 नमो शेतकरी योजना :
नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी भारताचा सर्व कार्यभार स्वीकारल्यानंतर, पहिलाच दिवशी त्यांनी पी एम किसान योजनेच्या सतरावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी या कागदपत्रांच्या फायली वरती सही केलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधील सतरावा हप्ता मिळणार आहे. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सतरावा हप्ता दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे की आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
Namo Shetkari 4th Installment 2024 अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी सरकारने सांगितले आहे की राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळण्याचे शक्यता सरकारकडून वर्तवले जात आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता तिसरा हप्ता शेतकऱ्यांना जमा होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि याच पार्श्वभूमी वरती खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लवकरच चौथा हप्ता मिळणार आहे.
Namo Shetkari 4th Installment 2024 नमो शेतकरी योजना ही एक शेतकरी महासन्मान निधी योजनेपैकी एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी सुद्धा या योजनेचे नेहमीच स्वागत केलेले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यांमधील महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. आणि 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी राज्य सरकारकडून मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे. केंद्र सरकारच्या पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेला अधिक व्यापक देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो आणि याचा फायदा राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना होताना दिसून येतो.
पी एम किसान योजनेवरती अवलंबून असलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी कोणत्याही शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारचे अर्ज भरून घेण्यात आले नव्हते. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो, अशा सर्व शेतकऱ्यांना थेट नमो शेतकरी योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पहिला हप्ता यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेला होता, आणि त्यानंतर एकाच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले होते.
नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी मिळणार ?
Namo Shetkari 4th Installment 2024 नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी कोणत्याही प्रकारची केवायसी करण्याची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही केवायसी केली असेल तर, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्यास त्यात खात्यावरती तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून या योजनेचे हप्ते थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. अशाप्रकारे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच या योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
खरीप हंगामासाठी मिळणार एक रुपयांमध्ये पिक विमा, असा करा अर्ज
नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- बँक खात्याची लिंक असलेला मोबाईल नंबर
- सातबारा आणि आठ अ प्रमाणपत्र
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळू शकत नाही.कारण या दोन्ही एकमेकांशी संलग्न असल्यामुळे नमो शेतकरी योजने करिता राज्य सरकारच्या वतीने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया घेता येत नाही. तुम्ही जर अजूनही पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज सादर केले नसतील तर तुम्हाला बी एम किसान यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन प्रकारे नोंदणी करता येणार आहे.Namo Shetkari 4th Installment 2024
या योजनेसाठी नोंदणी करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आणि कॅम्पुटर वरून सुद्धा या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता. यासाठी तुम्हाला सीएसटी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, इथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता आणि या योजनेसाठी नोंदणी करत असताना तुम्हाला खालील दिल्याप्रमाणे प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
- या योजनेसाठी नवीन अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटणावरती क्लिक करायचं आहे
- या योजनेसाठी अर्ज सादर करण्याकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड नंबर बँक खाते लिंक आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, आणि जर लिंक नसल्यास आधार कार्ड मोबाईल नंबरशी लगेच लिंक करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुम्हाला टॅब वर ग्रामीण भागांमधील शेतकऱ्यांनी रुरल फॉर्मवर क्लिक करायचं आहे
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्या शेजारी आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे
- यानंतर तुम्हाला राज्य निवडून त्यासमोर असलेल्या कोड टाकून गेट ओटीपी या बटनावर क्लिक करावे लागते
- यानंतर तुम्हाला आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येतो तो ओटीपी सुद्धा तिथे टाकायचा आहे.
- यानंतर तुम्हाला ओपन झालेले टॅब वरती तुमचे नाव, गाव, व तुमचा पत्ता या संदर्भात सर्व माहिती दिसणार आहे, ही सर्व माहिती योग्य एका तपासून तुम्ही तुमच्या शेती विषयीची माहिती आहे भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला लँड रजिस्ट्रेशन आयडी भरताना तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
- यानंतर तुम्हाला तुमच्या शेती बद्दल सर्व माहिती जसे की सातबारा व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचा आहे
- ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक प्रिंट आऊट घ्यायची आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत चौथा हप्त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://nsmny.mahait.org/
नमो शेतकरी योजना बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Mahiti Havi
FAQ
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेसाठी नवीन अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटणावरती क्लिक करायचं आहे
नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- बँक खात्याची लिंक असलेला मोबाईल नंबर
- सातबारा आणि आठ अ प्रमाणपत्र