Mukhyamantri Vayoshri Yojana 2024या लेखात आज आपण मुख्यमंत्री व यशश्री योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या मुख्यमंत्री वय श्री योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत या संदर्भात जो GR आलेला आहे त्या GR मध्ये तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ती सर्व तुम्हाला सांगितलेले आहेत .जीआर मध्ये अर्ज कधी सुरू होणार , पात्रता नक्की काय ,कागदपत्रे काय लागणार आहेत याबद्दल सर्व माहिती आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.
हा जीआर तुम्ही पाहू शकता राज्यातील 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे ही योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा जो जीआर आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली पाहायला मिळते. आज आपण या लेखात या योजनेसंबंधी सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 माहिती /mukhyamantri vayoshri yojana 2024 information :
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना /mukhyamantri vayoshri yojana 2024 |
कोणा द्वारे योजना सुरू करण्यात आली ? | महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे |
योजनेचा मुख्य उद्देश काय ? | जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक |
लाभ | 3000 /- |
योजनेसाठीची वयाची मर्यादा | 65 वर्षांपेक्षा जास्त अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता |
अधिकृत वेबसाईट | या योजनेसाठी लवकरच अधिकृत पोर्टल सुरू करण्यात येणार आहे |
मुख्यमंत्री वयोश्री योजना GR :
या योजनेमधून सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात गतिशीलता आणि सक्रियता आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन मोकळेपणाने जगता यावे त्यांचे कौटुंबिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असावे आणि त्यांना वयानुसार चांगले जीवन जगता यावे यासाठी सरकारने मुख्यमंत्री व यशश्री योजना सुरू केलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना अशक्तपणा , अपंगत्व आणि इतर आजारांचा सामना करावा लागतो यावरती उपाय म्हणून जे उपकरणे किंवा साधने लागणार आहेत ती त्यांना खरेदी करता यावीत यासाठी या योजनेमधून ज्येष्ठ नागरिकांना सरकार मदत देत आहे. तसेच त्यांचे मन स्वास्थ्य केंद्राच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी शासनाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता/Eligibility :
शासनातर्फे मुख्यमंत्री व यशस्वी योजनेच्या माध्यमातून काही मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत यासंबंधी महत्त्वाची माहिती खाली दिलेल्या आहेत.mukhyamantri vayoshri yojana 2024
- या योजनेसाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणे गरजेचे आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड किंवा आधार कार्ड साठी केलेला अर्ज किंवा नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये असावे , यासंबंधी अर्जदाराने स्वयंघोषणापत्र देणे गरजेचे आहे
- . मागील तीन वर्षांमध्ये सरकारच्या इतर योजना आणि विनामूल्य उपकरणाचा लाभ अर्ज करणाऱ्या व्यक्तीने घेतला नसावा. पात्र असणाऱ्या व्यक्तींना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत या रकमेतून उपकरण खरेदी केलेली आणि प्रशिक्षण घेतलेल्या संदर्भात त्यांचे प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत समाज कल्याण येथे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
- निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये एकूण लाभार्थी संख्येमध्ये 30 टक्के महिला असते.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ध्येय व उद्देश :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मुख्य उद्देश हे राज्यातील 65 व त्यावरील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जे अपंगत्व आहे यामध्ये अशक्तपणा येत असेल तर त्यांच्या वरती उपाय सुद्धा असतात आणि त्यांना जे काही साधन आणि उपकरणे लागत असतील ते त्यांना देण्यात येणार आहेत. तसेच मनस्वास्थ्य केंद्र लोगो उपचारासाठी केंद्र असतील त्यांची काही शरीराची पाहणी असेल ती सुद्धा फ्री मध्ये करून दिली जाणार आहे.
आणि यामध्ये अजून एक आहे ज्यामध्ये एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेमध्ये खातात जमा करण्यात येणार आहेत. . तसेच त्यांचे मन स्वास्थ्य केंद्राच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी शासनाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येणार आहे.सरकार ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून महिन्याला मिळणार आहे का वर्षाला मिळणार आहे तर ते जीआर मध्ये असं सांगितलेलं आहे की एक रक्कम याचा अर्थ वर्षातून एकदा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप :
mukhyamantri vayoshri yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजने मधून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सरकारकडून त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे उपकरणे तसेच साधने खरेदी करता येणार आहेत. जसे की ,
- चष्मा
- स्टिक विल चेअर
- श्रवण यंत्र
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- सर्वाइकल कॉलर
- Ni Brase
- Lamber बेल्ट
मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे / mukhyamantri vayoshri yojana 2024 Documents :
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो दोन
- मोबाईल नंबर बँक पासबुक झेरॉक्स ( राष्ट्रीय बँकेत खाते असणे आवश्यक आहे )
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- स्व – घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी दिलेली इतर आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : mukhyamantri vayoshri yojana 2024 apply Online :
महाराष्ट्रात राज्य सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे . 5 फेब्रुवारी रोजी या योजनेस संबंधित महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळातर्फे घेण्यात आला.आणि शासनातर्फे या योजनेसाठी 6 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे .परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अजूनही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून लवकरच या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येणार आहे . त्यामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याबद्दलची सर्व माहिती आपण दुसऱ्या लेखात पाहणार आहोत.
मुख्यमंत्री व यशश्री योजनेचा अर्ज करण्यासाठी : ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्या
मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थ्यांना किती रुपये मिळणार :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति 3हजार एकर कमी रक्कम मिळणार असल्याचे जीआर मध्ये सांगितले आहे. पात्र असणाऱ्या व्यक्तींना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत या रकमेतून उपकरण खरेदी केलेली आणि प्रशिक्षण घेतलेल्या संदर्भात त्यांचे प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत समाज कल्याण येथे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा :vedio credit : apal marathi network
FAQ :
1 . मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वृद्ध व्यक्तींना किती अनुदान देण्यात येते ?
वयोश्री योजनेतून वृद्ध व्यक्तींना तीन हजार रुपये अनुदान देण्यात येते .
2 . व यशश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते ?
वयोश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते .