शिलाई मशीन योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार 15000 रुपये , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Mofat Shilai Machine Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Mofat Shilai Machine Yojana 2024 पंतप्रधान विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना आपल्या देशामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक योजना राबवत असतात. देशांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे.

Mofat Shilai Machine Yojana 2024

ही योजना पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना म्हणून ओळखली जाते या योजनेच्या माध्यमातून देशांमधील 50 हजाराहून अधिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. यासोबतच या महिलांना शिलाई मशीन ची मदत आवश्यक आहे, जालना स्वतःचा स्वयंरोजगार उभा करायचा आहे, ज्यांना शिलाई मशीन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण तसेच त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याज दरात कर्जही उपलब्ध करून दिले जाते.

WhatsApp Group Join Now

मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश :

Mofat Shilai Machine Yojana 2024 आपल्या देशामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना घराबाहेर पडून काम करायचे नाही आणि त्यांना स्वतःच्या घरामध्ये स्वयंरोजगार सुरू करून उत्पन्न मिळवायचे आहे परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने अशा महिला आपल्या स्वयंरोजगार सुरू करू शकत नाहीत. स्वतःच्या घरामधून स्वयंरोजगार करून व्यवसाय सुरू करणे त्यांना शक्य होत नाही. परंतु अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीनच्या मदतीने घरी कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षणाच्या वेळी 15000 रुपयांचे आर्थिक सहाय्य सोबतच 500 रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.

शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक पात्रता :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे नाव बीपीएल शिधापत्रिका मध्ये असणे गरजेचे आहे
  • या योजनेचा लाभ वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना घेता येतो
  • अर्ज करणारी महिला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे
  • ज्या महिलांनी या आधी सरकारच्या योजनांचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेसाठी अपात्र केले जाईल.Mofat Shilai Machine Yojana 2024

Mofat Shilai Machine Yojana 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत 30 हजार अनुदान

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

शिलाई मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरांमधील उद्योग केंद्रात जाऊन पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज मिळवावा लागेल
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व सविस्तर माहिती भरावी लागेल
  • सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर , आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स अर्जासोबत जोडायचे आहेत
  • अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवून त्यावर तुमचे नाव आणि पत्ता लिहावा
  • हा अर्ज उद्योग केंद्रामध्ये जाऊन सबमिट करावा लागेल
  • यानंतर तुम्हाला शिलाई मशीन वितरण कार्यक्रमासाठी बोलावले जाईल ज्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन दिली जाईल.Mofat Shilai Machine Yojana 2024

एका तरुण शेतकऱ्यांची कमाल..!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment