90 टक्के अनुदानावर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर , 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ : Mini Tractor Anudan 2024

WhatsApp Group Join Now

Mini Tractor Anudan 2024 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात तर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

Mini Tractor Anudan 2024

Mini Tractor Anudan 2024 या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ती 9 ते 18 अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवोदय घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी घेऊ शकतात. अध्यक्ष सचिव आणि 80% सदस्य आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांमधील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने यांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा रुपये 3,500 इतकी आहे.

WhatsApp Group Join Now

शेतकरी सम्मान योजना उर्वरित कर्ज माफी मिळणार

स्वयंसाहाय्यता बचत गटांनी या कमाल मर्यादा रकमेच्या 10% स्व हिस्सा भरल्यानंतर 90% शासकीय अनुदान दिले जाते. 3 लाख 50 हजारांपेक्षा अधिक ची रक्कम संबंधित बचत गटांना स्वतः खर्च करावी लागेल. स्वयंसाहाय्यता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे आणि हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे.

Mini Tractor Anudan 2024 शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देता येईल :

Mini Tractor Anudan 2024 स्वयंसहाय्यता बचत गटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला या साधनांची विक्री अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तींकडे गहाण ठेवता येणार नाही. योजनेच्या अधिक माहिती तसेच इतर अटी किंवा शर्तीच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय , नासर्डी पुलाजवळ , नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा.

अनुसूचित जाती आणि जमातींसाठी दुधाळ जनावर गट पुरवठा योजना

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

WhatsApp Group Join Now

Leave a Comment