म्हाडा लॉटरी अंतर्गत फ्लॅट खरेदी करायचा आहे ? पहा कसा करावा अर्ज; पहा संपूर्ण माहिती : Mhada Lottery Scheme 2024

WhatsApp Group Join Now

Mhada Lottery Scheme 2024 या योजनेअंतर्गत पुणे येथे राहण्यासाठी हे चांगले घरे मिळण्यास मदत होते. महाराष्ट्रातील कोणताही लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. महाराष्ट्रातील सामान्य लोकांसाठी घरे अतिशय स्वस्त दरात मिळावी हा शासनाचा मुख्य उद्देश असून ही म्हाडा लॉटरी सुरू केलेली आहे. म्हाडा लॉटरी विषयी सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

Mhada Lottery Scheme 2024

Mhada Lottery Scheme 2024 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी :

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँकेने रद्द केलेला चेक किंवा पासबुकचे झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी

(Mhada Lottery Scheme 2024)अर्जदाराने पात्रता करून घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जाहिरात प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी जास्त वेळ किंवा मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे पात्रतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

Mhada Lottery Scheme 2024 उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे असेल :

1 ) अत्यल्प उत्पन्न गट :

  • मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र नागपूर सुधारण्यास प्रदेश तसेच दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रुपेश 6,00,000 पर्यंत
  • महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रुपये 4,50,000 पर्यंत((Mhada Lottery Scheme 2024)

2 ) अल्प उत्पन्न गट :

  • मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र नागपूर सुधार ण्यास प्रदेश तसेच दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये 9,00,000 रुपये पर्यंत
  • महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रुपये 7,50,000 पर्यंत

3 ) मध्यम उत्पन्न गट :

  • पुणे महानगर वृक्षत्र मुंबई महानगर क्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र नागपूर सुधारणा प्रदेश तसेच दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये क्षेत्र रुपये 12,00,000 पर्यंत
  • महाराष्ट्रामध्ये उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रुपये 12,00,000 पर्यंत

4 ) उच्च उत्पन्न गट :

  • पुणे महानगर क्षेत्र मुंबई महानगर क्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र नागपूर सुधार प्रज्ञा प्रदेश तसेच दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र कमाल मर्यादा नाही
  • महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र कमाल मर्यादा नाही

Mhada Lottery Scheme 2024 पात्रता ?

  • अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून पत्नीच्या अथवा अज्ञान मुलाच्या नावावरती , मालकी तत्त्वावर भूखंड अथवा निवासी गाळा घेतला नसल्याबाबतचे तसेच शासकीय गृहनिर्माण सभासद नसल्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे
  • अर्ज करणाऱ्या दिवशी अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे यामध्ये अर्जदार किंवा त्याची पत्नी व अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्त्वावर व इतर हक्का द्वारे संपादित केलेले निवासी घर योजनेच्या ग्राम पंचायत न पा मनपा हद्दीत नसावे.
  • अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष गळ्याचा ताबा घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. राखीव वर्गाच्या पात्रते संबंधित तपशिलावर माहिती संकेतस्थळावर जारी केलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आले आहे
  • (Mhada Lottery Scheme 2024) सोडत प्रक्रियेमधील सर्व संपर्क ऑनलाईन अपडेट करण्यात येतील. लेखी पत्रव्यवहार करता येणार नाही. मागच्या जाहिरातीतील पुणे सोडते मध्ये अर्ज केलेला असल्यास तोच युजर आयडी वापरावा. अथवा या सोडतीसाठी नवीन युजर आयडी व पासवर्ड वापरावा. वापरलेला युजर आयडी व पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अर्ज भरत असताना नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावरच रक्कम परतावा करण्यात येणार असल्यामुळे बँक खाते क्रमांक IFSC कोड काळजीपूर्वक व अचूक नमूद करावा.
  • म्हाडा ने कोणत्याही प्रकारच्या एजंटची नेमणूक केलेली नाही तसेच संगणकीय सोडतील कोणत्याही प्रकारचे मानवी हस्तक्षेप करता येऊ शकत नाही. यामुळे अर्जदारांना सुचित करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता कामा नये. या योजनेमधील आलेले कोणताही अर्ज किंवा सर्वच अर्ज कोणत्याही कारण न देता नाकारण्याचा किंवा संपूर्ण जाहिरात करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी पुणे मंडळ यांनी राखून ठेवलेला पाहायला मिळतो
  • जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल
  • जाहिरातीमध्ये चुकून झालेल्या छपाईच्या चुकांचा कोणत्याही प्रकारचा अर्जदारास फायदा घेता येणार नाही. सदर योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक होईल.
  • अर्जदारास एका संख्येतील एकाच आरक्षण गटांमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करताय येणार नाहीत असे आढळल्यास अर्ज सोडतीपूर्वी रद्द केले जाते. पात्र असलेल्या अर्जदाराने रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम कपात करण्यात येते

Mhada Lottery Scheme 2024

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी :

  • अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाचे भारतात कुठेही पक्के घर नसावे
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे
  • प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरासाठी अर्जदार कुटुंबामध्ये पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असणे तसेच घरासाठी कुटुंबातील कर्त्या महिलांच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावरती असतील
  • प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 2.50 लक्ष प्रति घरासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून एकूण अनुदान देण्यात येणार आहे
  • महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भुई भाडे व अक्रोशीक आकार पात्र लाभार्थ्यांना अदा करणे बंधनकारक आहे
  • पात्र झालेल्या अर्जदारांनी रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम कपात करण्यात येईल

पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी

  • अधिसूचनेमधील कलम 9.8 मधील तरतुदीनुसार पात्र असलेल्या लाभ धारकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या वर्षासाठी लागू असलेल्या वार्षिक दरसूची प्रमाणे घराचे बांधकाम देखभाल व इमारत दुरुस्तीच्या देखभाल खर्चापोटी ठेव स्वरूपात जमा करणे बंधनकारक राहते
  • कलम 9.10 च्या तरतुदीनुसार या योजनेतील पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारचे शासकीय कर जसे मुद्रांक शुल्क जीएसटी इत्यादी तसेच सामाजिक करण्यासाठी आवश्यक शुल्क विकास देणे बंधनकारक राहते.
  • या योजनेमधून पात्र असलेल्या अर्जदारांनी रकमेचा परतावा मागितल्यास अर्ज सोबत भरलेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम कपात करण्यात येते

Mhada Lottery Scheme 2024 योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://housing.mhada.gov.in/

म्हाडा लॉटरी अंतर्गत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit RK Property News

FAQ

पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी काय आहेत ?

  • अधिसूचनेमधील कलम 9.8 मधील तरतुदीनुसार पात्र असलेल्या लाभ धारकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या वर्षासाठी लागू असलेल्या वार्षिक दरसूची प्रमाणे घराचे बांधकाम देखभाल व इमारत दुरुस्तीच्या देखभाल खर्चापोटी ठेव स्वरूपात जमा करणे बंधनकारक राहते

म्हाडा लॉटरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ?

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँकेने रद्द केलेला चेक किंवा पासबुकचे झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी काय आहेत ?

  • अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाचे भारतात कुठेही पक्के घर नसावे
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे
WhatsApp Group Join Now

Leave a Comment