Maharashtra Economy Budget 2024 राज्य विधिमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दिनांक 27 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2023-24 वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहामध्ये सादर केलेला आहे. यामध्ये 202324 मध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.6% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
ही वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच असून त्यामध्ये, राज्याचे 40 लाख 44 हजार 898 कोटी रुपये स्थूल उत्पन्न अपेक्षित आहे असे सांगितले. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा 9.1% वाढ करणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे
विद्यमान महायुती सरकारच्या काळामध्ये सुद्धा शेवटच्या अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली होती. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल सभागृहामध्ये सादर केला आहे. दिनांक 28 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत असल्याच्या सूचना करत असताना कृषी आणि कृषी पूरक क्षेत्रामध्ये 1.9% टक्क्यांनी वाढ करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. तर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा 7.6 आणि इतर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा 8.8% वाढ करणे अपेक्षित आहे, असे सांगितले. या पाहणी अहवालाच्या माध्यमातून राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विचार करता पिकांच्या विभागांमध्ये 1.5% घट होणार आहे असा अंदाज व्यक्त केला.
याबरोबरच मासेमारी आणि जलसंवर्धनामध्ये सुद्धा 2.9%, 1 संवर्धनामध्ये 9.2% एवढी वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. बांधकामांमध्ये 6.2%, उद्योग क्षेत्रामध्ये 7.6%, वस्तू निर्मिती क्षेत्रामध्ये 7.5%, राज्याच्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल आणि उपहारगृहे, वाहतूक, साठवण व दळणवळण, तसेच प्रसारण संबंधित सेवाक्षेत्रांमध्ये 6.6%, वित्तीय स्थावर मालमत्ता, आणि व्यवसायिक सेवांमध्ये 10.1% वाढ करणे गरजेचे आहे.
सेवा क्षेत्राचा वाटा मोठा : (Maharashtra Economy Budget 2024)
राज्याच्या आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा म्हणजे 63.8 % एवढा वाटा देण्यात आलेला आहे. याच्या खाली उद्योग या क्षेत्राचा वाटा पंचवीस टक्के एवढा आहे. कृषी आणि संलग्न कार्यामध्ये 11.2% एवढे वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याच्या सरासरी हिस्सा सर्वाधिक आहे म्हणजेच 13.9% एवढा आहे. 2021-22 या काळामध्ये राज्याचे उत्पन्न हे दोन लाख एकोणवीस हजार 573 इतके होते.
यामध्ये 2022-23 मध्ये वाढ झालेली आहे ते आता 52 हजार 389 इतके झालेले आहे. सन 2023-24 मध्ये राज्याचे उत्पन्न अंदाजे 40 पॉईंट 44 लाख कोटी एवढ्या असून त्यामध्ये आता गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.9% एवढे वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. देशांतर्गत उत्पन्न हे 293 पॉईंट 90 लाख कोटी रुपये असून यामध्ये 2022-23 च्या तुलनेत 9.1% एवढे वाढ अपेक्षित आहे. याबरोबरच वास्तविक उत्पन्न हे २४.११ लाख कोटी असून यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7.6% वाढ अपेक्षित आहे.
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या नंबर वर
2023-24 काळामध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न दोन लाख 77 हजार 603 रुपये एवढे अपेक्षित होते, 2022-23 मध्ये यामध्ये दोन लाख 52 हजार 389 रुपये एवढे होते. 2023-24 मध्ये देशाचे दरडोई उत्पन्न एक लाख 83 हजार 236 रुपये एवढे असून मागील वर्षी ते एक लाख 69 हजार 496 रुपये एवढे होते. 2022-23 या वर्षांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तेलंगणा राज्य देशांमध्ये प्रथम क्रमांकावर होते. त्याच्याखाली कर्नाटक हरियाणा तमिळनाडू गुजरात हे राज्य होते. यामध्ये आता महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे