Ladaki bahin yojana arj 2024 : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांशी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत आज प्रक्रिया सोपी करण्यात आली असून फक्त चार कागदपत्रांची आवश्यकता आहे या लेखात आपण फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
आधार कार्ड हे पहिल्या आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे हे एक अनिवार्य कागदपत्र असून प्रत्येक अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे .
पंधरा वर्षाचा पुरावा अर्जदाराला महाराष्ट्रातील 15 वर्षाच्या वास्तव्याच्या पुरावा सादर करावा लागेल यामध्ये खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडता येईल :
- डोमासाईल सर्टिफिकेट
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म दाखला
- मतदान कार्ड
उत्पन्नाचा दाखला यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत :
- पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- तहसीलदार कार्यालयाकडून मिळवलेला उत्पन्नाचा दाखला
अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते उत्पन्नाचा पुरावा म्हणून मान्य केले जाईल अन्यथा तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला घेणे आवश्यक आहे . फॉर्म भरताना अर्जदाराची स्वाक्षरी केलेले हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे हा या हमी पत्रात दिलेली साथ माहिती सत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र असते . (Ladaki bahin yojana arj 2024)
लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी आहे ?
- ऑनलाइन पोर्टलवर जा आणि लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने तयार केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावा
- नोंदणी करा आणि नवीन अर्जदाराने प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागतो
- नोंदणी केल्यानंतर दिलेल्या क्रेडिशनल वापर करून लॉगिन करावा
- अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक माहिती जसे की नाव जन्मतारीख पत्ता इत्यादी भरा
- वर नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असल्याची खात्री करा
- फॉर्म पूर्ण करा आणि सबमिट करा तसेच सर्व माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा तपासता आणि सबमिट करा
- फॉर्म यशस्वीरित्या संगीत झाल्यानंतर पावती डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा .
सर्वर समस्या टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा यावेळी सर्वर वरील ताण कमी असतो . आणि फॉर्म भरणे सुलभ होते फॉर्म भरताना कोणतीही समस्या आल्यास किंवा अधिक मार्गदर्शनाची गरज असल्यास शासनाचे अधिकृत हेल्पलाइन याच्याशी संपर्क साधा फॉर्म भरण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा . यामुळे प्रक्रिया गतिमान होईल फॉर्म भरताना दिलेली सर्व माहिती अचूक आणि सत्य असल्याचे खात्री करा चुकीची माहिती दिल्यास अर्जंट आकारला जाऊ शकतो फॉर्म भरण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत सादर करा .
राशन कार्ड ई-केवायसी करा, नाहीतर राशन होईल बंद
( Ladaki bahin yojana arj 2024 )लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया सोपी करण्यात आली असून फक्त चार कागदपत्रांची आवश्यकता आहे . वरील माहिती चा वापर करून अर्जदार सहजपणे आणि यशस्वीरित्या अर्ज करू शकतात या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन मिळत यासाठी ही सारखी लाडकी बहिणी योजना आयोजित केलेली आहे .