Ladaki Bahin Yojana 2024 मध्य प्रदेशातही लाडकी बहीण ही योजना सुरू होती. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, लाडकी बहीण ही योजना नक्की काय आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे, आणि या योजनेचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे, सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला ही बहीण लाडकी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, त्याआधी तुम्हाला या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूयात बहीण लाडकी ही योजना काय आहे.
Ladaki Bahin Yojana 2024 मध्य प्रदेश येथे बहीण लाडकी ही योजना करणे सुरू केलेली होती. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र मध्ये सुद्धा लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्री लवकरच सुरू करतील याची सर्वांना शक्यता वाटत आहे. ही योजना सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती हालचाली सुरू आहेत.
महाराष्ट्रात लवकरच लडकी बहीण योजना :Ladaki Bahin Yojana 2024
Ladaki Bahin Yojana 2024 याबाबतचे सर्व सविस्तर वृत्तपत्र हे लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने प्रकाशित केलेले आहे. चहा प्यायचा लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याची शक्यता या वृत्तानुसार वर्तवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण मतदारांनी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्व विरोधी पक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. राज्य सरकारद्वारे तरुण मतदारांना आणि महिला मतदारांना जास्त प्रमाणात आकर्षित करून घेण्यासाठी हा निर्णय घेतला असावा. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे पथक मध्य प्रदेशामध्ये पाठवलेले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा सर्व अभ्यास करण्यात आलेला होता. यामध्ये ही योजना कशी राबवली जाते ? या सर्वांचा अभ्यास या पथकाने केलेला आहे. यानंतर आता महाराष्ट्र मध्ये लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यासाठी विविध हालचाली केल्या जात आहेत, असे सांगितले आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेची घोषणा केली जाऊ शकते, असे सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.
Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेसाठी पात्रता :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला हवे
- कुटुंबामध्ये कोणीही आयकर भरणारे नसावे
- या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
या योजनेचे लाभ : Benifits Of Scheme
- लाडकी बहिणी या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पुरवणे
- महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवणे
- दर महिन्याला 1200 रुपये एवढे रक्कम देणे
- या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वर्ष असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
योजनेचे स्वरूप :
Ladaki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधील गरीब महिलांना आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या 90 ते 95 लाख महिलांना दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या 20 ते 60 वर्षे वयोगटातील विधवा, महिला, आणि परितक्त्या, घटस्फोटीत, महिलांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला ही रक्कम जमा केले जाणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : Documents
- महिलांचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- विवाह प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला(2.5 लाखापेक्षा कमी )
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
Ladaki Bahin Yojana 2024 मध्य प्रदेश सरकारने योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक पद्धत वापरली होती. लाभार्थ्यांकडून मध्य प्रदेश सरकारने या योजनेसाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरून घेतले होते. लाभार्थ्यांकडून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थ्यांना दर महिन्याला 1250 एवढे रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली होती.
महाराष्ट्र सरकार या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे सादर करावा हे अद्यापही सांगितलेले नाही. जेव्हा ही योजना सुरू करण्याची घोषणा केली जाईल त्यावेळेस या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे सादर करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! गाईच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana
FAQ
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?
- महिलांचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- विवाह प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला (2.5 लाखापेक्षा कमी )
या योजनेचे लाभ काय आहेत ?
- लाडकी बहिणी या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पुरवणे
- महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवणे
- दर महिन्याला 1200 रुपये एवढे रक्कम देणे
- या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वर्ष असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.