खरीप हंगामात 7150 कोटी विमा भरपाई मंजूर, पहा किती मिळणार नुकसान भरपाई : Kharip Vima 2024

WhatsApp Group Join Now

Kharip Vima 2024 खरीप हंगाम 2023 मध्ये नुकसान झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत तब्बल सात हजार 149 कोटी रुपये विमा भरपाई दिली जाणार आहे.

Kharip Vima 2024

यापैकी 3965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. आणि उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केलेले आहे. शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केलेले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. या सर्व बदलांमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावरती आणि पीक कापणी प्रयोग वरती आधारित नुकसान भरपाईची रक्कम जादा प्रमाणात दिली जाणार आहे.

मागील खरीप हंगामामध्ये राज्यात पाऊस कमी पडलेला होता. अनेक भागांमध्ये तर पेरणी सुद्धा करता आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई लागू केली जाणार आहे. पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज 36 हजार 684 होते. अशा शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाला होता. जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली आहे.

WhatsApp Group Join Now

अग्रीम रक्कम 2578 कोटी ऑगस्ट 2023 मध्ये राज्यांमधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस कमी पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही योजना लागू झाली आहे आणि शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम भरपाई देण्याच्या सूचना अनेक जिल्ह्यांमध्ये केलेल्या आहेत.

कंपन्यांनी सुद्धा हे अग्रीम रक्कम मंजूर केले आहे. अग्रीम रक्कम 56 लाख 43 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. अशा शेतकऱ्यांना 2578 कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली आहे. यापैकी 2554 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा ही झालेले आहेत. परंतु आता उर्वरित भरपाईचे केवळ 24 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे.

(Kharip Vima 2024) स्थानिक नैसर्गिक आपत्ती :

सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीच्या पूर्व सूचना देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पंचनामा पूर्ण होण्याआधीच भरपाई मंजूर झाली आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासारख्या नुकसानीमुळे नुकसान भरपाईसाठी 19 लाख 85 हजार विमा अर्ज पात्र ठरले आहेत. यामधून शेतकऱ्यांना 1426 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यापैकी 1068 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. उरलेले 358 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

 Kharip Vima 2024

(Kharip Vima 2024) पीक काढणी पश्चात भरपाई :

शेतामधील पीक काढण्याआधी नुकसान भरपाईसाठी जवळपास दीड लाख अर्ज पात्र ठरलेले आहेत. या शेतकऱ्यांना 116 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाले आहेत. यापैकी 66 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. उर्वरित पन्नास हजार कोटी लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी !! 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ

3013 कोटी पीक कापणी प्रयोगातून मंजूर :

पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आकडा सर्वात जास्त आहे. केंद्र सरकारने अगदी शेवटच्या क्षणी नुकसान भरपाई देण्याच्या सूत्रामध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

32 लाख 42 हजार अर्ज पीक कापणी प्रयोगावर आधारित पात्र ठरले आहेत. यापैकी शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 262 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. उर्वरित 2751 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहे .असे कृषी विभागांवर सांगण्यात आले आहे.

पिक विम्याची स्थिती :

अर्ज :

एक कोटी दहा लाख 53 हजार

विमा भरपाई मंजूर :

7 हजार 149 कोटी रुपये

खात्यामध्ये जमा :

3 हजार 965 कोटी रुपये

शिल्लक रक्कम :

3 हजार 83 कोटी रुपये

शेळीपालन योजनेतून 100 शेळ्या 5 बोकड खरेदीसाठी 10 लाखाचे अनुदान मिळणार

पिक विमा स्टेटस पहा : https://pmfby.gov.in/

WhatsApp Group Join Now

Leave a Comment