Kapus lagvad mahiti marathi 2024 : कमी अंतरावर कापसाची लागवड करून एकरी झाडांची संख्या म्हणजे घनता वाढवणे यालाच सघन लागवड पद्धत असे म्हणतात. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते महाराष्ट्रात यंदा कापसाला7000 ते 8000 पर्यंत दर मिळालेला होता यंदा कापसाचे अनेक वान शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वापरले यामध्ये काही वाणांमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला तर काही वाहनांमुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळाले नाही शेतकऱ्यांनी कापूस शेती करत असताना विविध नियोजन करत असताना सगन कापूस लागवड पद्धतीचा वापर करून कापूस उत्पादन वाढवावे त्याचबरोबर कशी लागवड केली जाते याबाबतची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र मधील सध्या पांढरा कापूस जास्त पिकवला जातो त्याचबरोबर आता नवीन वाण म्हणजेच पिवळा कापूस गुलाबी कापूस लाल कापूस जांभळा कापूस असे अनेक वाण उपलब्ध झालेले आहेत. महाराष्ट्र मध्ये आकोट मसवत मानवत हिंगोली अकोला यवतमाळ औरंगाबाद त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कापूस पिकवत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते कापसाचे उत्पादन कमी झाल्यास शेतकऱ्यांना घातलेला खर्च निघाला पाहिजे असा अंदाज असतो पण सध्याच्या परिस्थितीनुसार व खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जेवढा कापूस उत्पादन होते त्यामध्येच निघून फायदा राहणे मुश्किल झाले आहे यामुळेच विविध नियोजन करून कापूस उत्पादन वाढावे याबाबत आपण माहिती दिलेली आहे. कापूस उत्पादन वाढवण्याकरिता या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता यामध्ये लागवडीचे अंतर वानांची निवड कीटकनाशक/ खत नियोजन त्याचबरोबर इतर नियोजनाची माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.
Kapus lagvad mahiti marathi 2024 महाराष्ट्रातील कापूस लागवड :
cotton update: कापूस पिकाचे जागतिक उत्पादन(750kg) आणि राष्ट्रीय उत्पादन(439kg) यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे उत्पादन फारच कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात कापूस पीक क्षेत्रापैकी कोरडवाहू लागवड मोठ्या प्रमाणात होते.कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक आहे. अशा परिस्थितीमध्ये अनुरूप लागवड पद्धतीचा अवलंब या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी करणे आवश्यक आहे.विदेशी लागवड पद्धत अभ्यासून त्यांच्याप्रमाणेच भारतातही कमी अंतरावर लागवड करून हेक्टरी रोपांची संख्या वाढवल्यास उत्पादन वाढवता येऊ शकते यावर संशोधन झाले. परंतु भारतात संकरित कापूस लागवड केली जाते.
या बियाण्यांच्या किमती जास्त असल्याने उत्पादन खर्च वाढतो. जास्त किंमत असणाऱ्या संकरित वाहनांची लागवड कमी अंतरावर केल्यास झाडामध्ये दाटी होऊन त्यांचे दुष्परिणाम होण्याची भीती असते. यामुळे मागील दहा वर्षात संशोधन करून कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी सघन कापूस लागवड पद्धत विकसित केली आहे.
Kapus lagvad mahiti marathi 2024 सघन लागवड पद्धत म्हणजे काय ?
कमी अंतरावर कापसाची लागवड करून एकरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढवणे यालाच सघन लागवड पद्धत असे म्हणतात. या लागवड पद्धतीमध्ये लागवडीचे योग्य अंतर ,त्यासाठी वाणांची निवड ,पिकांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन, आणि वाढवलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते.
1)लागवडीचे अंतर:
रोपांची संख्या वाढवण्याकरिता लागवडीचे अंतर कमी करायचं असतं यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनानुसार भेटी कापूस वाहनांच्या लागवडीसाठी 90×30 सेंमी (3x 1 फूट) अंतरावर शिफारस केली जाते.
दोन ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर (3 फूट )ठेवून दोन झाडातील अंतर 30 सेंटीमीटर एक फूट ठेवावे. अशा अंतरावर लागवड केल्यास एक एकर क्षेत्रामध्ये 14520 रोपे बसतील.
महाराष्ट्रात साधारणपणे विभागानुसार व माती प्रकारानुसार कापसाची लागवड3×2 फूट, 4×1.5 फूट, 3फूट, 4×3 फूट, 5×1 फूट, 6×1 फूट अशा विविध अंतरावर करता येते. म्हणजे या विविध पारंपारिक अंतरावरील लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या 7260, 4840, 3630, 8712, अशी असते. सघन लागवडीमध्ये पारंपारिक लागवड पद्धतीपेक्षा एकरी झाडांची संख्या दुप्पट ते चार पट असते. या लागवडीमध्ये एका झाडाला सरासरी 20 कैऱ्या लागतील असे अपेक्षित आहे.
2)वाणांची निवड:
दीर्घ कालावधीची अधिक वाढ असणारे व हाताने सिंचना प्रतिसाद देणारे संकरित वाण जास्त वापरले जाते तसेच सघन लागवड पद्धतीमध्ये अशोक ठेवून असणारे आवश्यक असते.
म्हणजे असे मानकी ज्याच्या झाडांची उंची आणि फांद्यांची लांबी कमी आहे. बाजारांमधील बहुतांश या वाण निकषात बसत नाहीत. काही निवडक कंपन्यांनी विशिष्ट वाण सघन लागवडीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे सगन लागवडीसाठी उंची आणि फांद्याची लांबी कमी असणारे वाण निवडावे लागते.
3)वाढरोधकाचा वापर :
(Kapus lagvad mahiti marathi 2024 )सघन लागवडीमध्ये झाडांची वाढ प्रमाणात ठेवण्यासाठी वाढ रोजगार चा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी मेपिकवाट क्लोराईड या वाढरोधकाचा 12 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे दोन वेळा फवारणी कराव्या लागतात. यामध्ये फार विकास पाटील लागण्याच्या काळात पहिली फवारणी आणि दुसरे फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी म्हणजेच 60 दिवसांच्या काळात करावी लागते.
फवारणी करण्यावेळी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये ओलावा नसल्यास पाऊस होईपर्यंत 3-4 दिवस थांबावे अथवा उपलब्धता असल्यास संरक्षित सिंचन पाणी देऊन फवारणी करावी.
या फवारणीमुळे काड्यांमधील अंतर कमी होते. म्हणजे शासकीय वाढीसाठी वापरले जाणारे अन्नघटक फुले लागणे आणि बोंडांची वाढीसाठी वापरली जाते. म्हणजे फांद्यांची लांबी आणि झाडांची उंची प्रमाणात राहते, पण फुले बोंडांची वाढ होते. सघन लागवडीमध्ये पिकांची जास्त वाढ झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.
किसान क्रेडिट कार्ड साठी करा ऑनलाईन अर्ज आणि 1 लाख 75 हजार मिळवा कर्ज पहा सविस्तर माहिती
4) खत व्यवस्थापन:
आपण सघन लागवडीमध्ये झाडांची संख्या एकरी वाढवलेली असते त्यांची वाढ प्रमाणात ठेवून वाढलेल्या झाडांपासून अपेक्षित वाढीव उत्पादन यांचे एकरी जैविक वजन अधिक होणार आहे.
आवश्यक अन्नपुरवठा कापसाच्या वाढलेल्या जैविक उत्पादनासाठी करण्यासाठी आपल्या विभागातील पारंपारिक पद्धतीने बीटी कापूस पिकासाठी आलेल्या शिफारशीपेक्षा sfuradआणि पालाशची मात्रा अधिक द्यावी.
परंतु नत्राची एक दोन महिन्यांनी द्यावयाची मात्रा देण्याआधी पिकाची वाट पाहूनच निर्णय घ्यावा. झाडाची वाढ समाधान पूर्वक असल्यास नत्राची मात्र वाढवू नये. असे झाले तर नत्राची मात्रा जास्त झाल्याने शाकीय वाढ जास्त होईल आणि फुले पाते यांची संख्या कमी होईल. म्हणूनच नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा.
Dr.Arvind pandagale (सहाय्यक कृषी विद्यावता),7588581713,Dr.Khijar beg (कापूस विशेषज्ञ),7304127810, (कापूस संशोधन केंद्र, नांदेड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)(Kapus lagvad mahiti marathi 2024 )
कापूस लागवडी बाबत व्हिडिओ पहा : Video Credit Agricoss Farmer
FAQ :
सघन कापूस लागवड पद्धत म्हणजे काय ?
कमी अंतरावर कापसाची लागवड करून एकरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढवणे यालाच सघन लागवड पद्धत असे म्हणतात.
कापूस लागवडीचे अंतर किती असावे ?
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनानुसार भेटी कापूस वाहनांच्या लागवडीसाठी 90×30 सेंमी (3x 1 फूट) अंतरावर शिफारस केली जाते.