kanda chal yojana 2024 राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक शेतकरी करत असतात त्यामुळे अनेक कांदा मोठ्या प्रमाणात खराब होतो त्याचबरोबर त्याचे नुकसानीही होते तसेच कांद्याची प्रत व टिकाऊ पणा यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा दाबावर परिणाम होतो त्यामुळे शास्त्रशुद्ध प्रमाणात कांदा चाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन त्यामध्ये अधिक उत्पन्न मिळते त्यामुळे कांदा चाळ योजना एक महत्वकांक्षी योजना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे.
kanda chal yojana 2024 राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन जास्त आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे अनेकदा शेतकरी कांद्याच्या चांगल्या भावासाठी कागदा साठवणूक करून ठेवत असतात पण साठवणूक केल्याने कांदा उत्पादनात घट होते आणि त्याच्यामुळे कांदा खराब झाल्यामुळे कांद्याला दर मिळत नाही तर त्यामुळे ही अडचण पाहता कांदा चाळ अनुदान राज्य शासनाने या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे या पार्श्वभूमीवर कांदा चाळ योजना शेतकरी राबवू शकतात व त्यासाठी अनुदान घेऊ शकतात
कसे मिळते अनुदान :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुदान योजनेअंतर्गत दहा ते पंधरा मेट्रिक टन एवढा क्षमतेच्या वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ घेता येतो या योजनेचा लाभार्थी हा अल्पभूधारक व त्याचबरोबर जॉब कार्डधारक असणे बंधनकारक आहे तसेच या योजनेअंतर्गत आकुशल व कुशल आदीमार्फत 25 मे ट्रिक टन कांदा चाळीला एक लाख 60 हजार रुपये इतक्या अनुदान दिले जाते
90 टक्के अनुदानावर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर , 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
kanda chal yojana 2024 महत्त्वाच्या बाबी :
शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करताना स्वतःच्या मालकीची जमीन आवश्यक आहे त्याचबरोबर
सातबारा उतारा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे
शेतकऱ्याचे स्वतःचे कांदा पीक असणे बंधनकारक आहे
योजनेचा ला वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गट स्वाहांसहायता गट महिला बचत गट शेतकरी उत्पादक संघ यांना घेता येतो
आवश्यक कागदपत्रे :
- सातबारा व आठ अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जॉब कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- स्वयंघोषणापत्र
लाडकी बहीण योजनेसाठी शासनाचा नवीन निर्णय , पहा काय आहे नवीन शासन निर्णय
योजनेचा अर्ज कोठे करावा :
या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकणार आहात यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आणि तिथून तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्हाला मोबाईलवर अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन अर्ज करू शकता.
महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login