falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 आज आपण आपल्या या लेखांमध्ये फळ पिके फुल पिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना 202425 मध्ये समाविष्ट असलेली फळ पिके फुल पिके व बांबू लागवडीसाठी अर्ज कसा सादर करावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना सन 202425 मध्ये समाविष्ट असलेली फळपीके फुल पिके व बांबू लागवडीसाठी तसेच सलग क्षेत्रावर ती फळबाग लागवड, बांधांवरती फळझाडे, लागवडीकरिता संबंधित गावांचे कृषी सहाय्यकाकडे अर्ज सादर करावा. असे शेतकऱ्यांना प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी आवाहन केलेले आहे.
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 या फळ पिकासाठी मिळवा अनुदान :
फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून विविध फळांचा जसे की आंबा चिकू पेरू डाळिंब कागदी लिंबू संत्रा मोसंबी सीताफळ नारळ आवळा अंजीर जांभूळ चिंच फणस शेवगा काजू ड्रॅगन फ्रुट केळी द्राक्ष अशा विविध पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच योजनेच्या माध्यमातून गुलाब मोगरा व निशिगंधा या फुल पिकांसाठी आणि सण २०२४२५ या वर्षांमध्ये बांबू लागवड करण्यासाठी या योजनेच्या स्वरूपात मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 या फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून बारामती मध्ये 240 हेक्टर, इंदापूर 230 हेक्टर, दौंड 222 हेक्टर, आणि पुरंदर 220 हेक्टर, असे एकूण 912 हेक्टर वरती फळ पिक, फुल पिक आणि बांबू लागवडीसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अशा पिकांच्या लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.क्षेत्राच्या स्थितीनुसार लागवडीचे अंतर सुद्धा कमी जास्त करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, परंतु देण्यात येणाऱ्या अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारसी नुसार अंतर मर्यादितच देण्यात राहील. या योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त कलमे रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही.
असे मिळते अनुदान :
या योजनेच्या माध्यमातून लागवड वर्षासाठी सलग तीन वर्ष मंजूर अंदाजपत्रक अनुसार अनुदान देण्यात येईल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षासाठी बागायती पिकां करिता जे लाभार्थी 90% फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू बळ पिकांचे 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना हेक्टरी 20 रोपे मर्यादेमध्ये वैयक्तिक बांधावरील फळ पिकांच्या लागवडीसाठी राबवण्यात येणार आहे.
प्रति लाभार्थी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.00 हेक्टर अशाप्रकारे क्षेत्र मर्यादा असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभधारकांच्या नावावरती जमीन असणे बंधनकारक आहे. सातबारा वरती कुळाचे नाव असल्यास गुळाची संमती असणे आवश्यक असते.
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,भटक्या जाती ,दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना ,तसेच अल्प व अत्यल्प महिला लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. बांदल यांनी लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉब कार्ड धारक असावा असे लाभार्थी निवडीचे निकष दिलेले आहेत.
जळगाव मध्ये केली जाते केळींची विदेशात निर्यात :
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 फळे फुले व बांबू लागवडीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. फळ पिकांच्या लागवडीमध्ये जळगाव जिल्हा केळींसाठी मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकांची मोठ्या प्रमाणात विदेशी निर्यात होत असल्याचे दिसून येते. जळगाव मध्ये केल्या जाणाऱ्या केळीच्या फळबागांची मोठ्या प्रमाणात विदेशामध्ये निर्यात केले जाते. यामुळे शेतकरी आता त्यांच्या शेतामध्ये अनेक बदल घडवून जास्त उत्पादन घेत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये केल्या जाणाऱ्या फळ पिकाबद्दल माहिती खाली दिल्याप्रमाणे आहे.
शेतकऱ्यांना नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण माहिती
65 हेक्टर क्षेत्रावरती फळबागा :
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केळीसाठी जळगाव जिल्हा ओळखला जातो. परंतु जळगाव जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या काही वर्षांमध्ये आता केळी व कापसाच्या पिकांकडून इतर फळ पिकांकडे वळत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस या नगदी पिका सोबत फळ पिकांचे क्षेत्र हे वाढू लागले आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 65 हजार हेक्टर क्षेत्रावरती 16 प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची लागवड केलेली दिसून येते. यामध्ये फक्त फळबागांची शेती नाही तर विदेशामध्ये हे फळांची निर्यात जिल्ह्यामधील शेतकरी करू लागलेले आहेत.
सर्वाधिक केळीचे क्षेत्र :
falbagh Lagavad Anudan maharashtra 2024 फळबाग लागवड यांचे एकूण क्षेत्र 65 हजार 899 इतके असून यामध्ये सर्वाधिक 52 हजार हेक्टर क्षेत्रावरती केळी फळांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. केळीच्या फळबागांसाठी जिल्हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आता शेतकऱ्यांनी फळ पिकांना आंतरपीक म्हणून घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आदर्श शेतकऱ्यांना एकाच हंगामामध्ये दुहेरी उत्पन्न मिळवता येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 36 हजार 53 हेक्टर भुसावळ तालुक्यामध्ये १०९६ हेक्टर तर यावल तालुक्यामध्ये दहा हजार 9993 हेक्टर रावेर तालुक्यामध्ये 22 हजार 478 हेक्टर चोपडा तालुक्यामध्ये 4881 हेक्टर णि चाळीसगाव तालुक्यामध्ये 1766 हेक्टर वरती करण्यात आलेले आहेत.
विजय पाटील पेरू उत्पादक शेतकरी असे म्हणाले की, केळी बागेची लागवड तर केले जाते परंतु त्याबरोबर आता इतर फळांची सुद्धा लागवड आम्ही करत आहोत. ते असे म्हणाले की मी पपई व पेरूची लागवड माझ्या शेतामध्ये केलेली आहे. पेरू पिकांची लागवड करून त्यासोबत त्यांनी अन्य पिकांची ही लागवड केलेली आहे. त्यामुळे मला दुहेरी उत्पन्न मिळवता येत आहे. तर ज्ञानेश्वर चौधरी टरबूज उत्पादक शेतकरी यांनी असे सांगितले की, शेतकरी आता बाजारपेठ यांची स्थिती पाहून आपल्या शेतीमध्ये बदल करू लागला आहे. फक्त पारंपारिक के न घेता याबरोबर जमिनीची क्षमता ओळखून शेतकरी आता शेती करत आहेत. शासनाकडून फळ पिकांसाठी अनुदान मिळत आहे तसेच बाजारामध्ये नेहमी फळपिकांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील असते.
विदेशामध्ये केळींची निर्यात :
जळगाव जिल्ह्यामधील केळीचे विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकांची विदेशामधील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. भारतामधील विविध देशांमध्ये जिल्ह्यांमधून बरेच शेतकरी आपला मान विदेशामध्ये निर्यात करू लागलेले आहेत. या सोबतच मोसंबी व टरबूज या फळ पिकांची सुद्धा विदेशामध्ये निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लिंबू व मोसंबी या फळ पिकांचे क्षेत्र सुद्धा वाढत चाललेले पाहायला मिळते. पपई व पेरू या फळांचे क्षेत्र वाढत चालले असून, शेतकरी आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक बदल करत असल्याचे दिसून येते.(falbagh Lagavad Anudan maharashtra 2024)
फळबाग लागवड योजनेची व्हिडिओद्वारे माहिती पहा : Yojnanchi Mahiti
फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते ?
जर तुम्ही जॉब कार्ड धारक असाल तर तुम्हाला फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान मिळते.
फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा ?
फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज महाडीबीटी वेबसाईटवर करावा