अशी करा तुमच्या शेतीची ई पिक पहाणी version-2 च्या मदतीने : E Pik Pahani 2024

WhatsApp Group Join Now

E Pik Pahani 2024ई पिक पाहणी म्हणजे काय एपिक पाणी उद्दिष्ट एपिक पाहणी फायदे क मध्ये असलेल्या विविध सुविधा एपिक पाहणी कशी करायची आणि ॲप डाऊनलोड कसे करावे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण आज आपल्या या लेखात पाहणार आहोत.

E Pik Pahani 2024

E Pik Pahani 2024 ई पीक पाहणी म्हणजे काय ?

शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी ठेवण्याचे काम सर्वेक्षण मोबाईल ॲप केले जाते. शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ ई पीक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देण्यात येतोई पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे पीक विमा भरणे तसेच पीक नुकसानी भरपाई शक्य होणार आहे

WhatsApp Group Join Now

ई पीक पाहणी चे मुख्य उद्दिष्ट :

  • पीक पेरणी अहवालाची माहिती एकत्रित करणे
  • माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करता येते
  • पीक पाहणी तसेच पीक विमा दावे निकालात काढणे.

E Pik Pahani 2024 benefits ई पीक पाहणी चे फायदे कोणते ? :

  • गाव जिल्हा तालुका आणि विभागातील पिकाखाली असलेल्या क्षेत्राची आकडेवारी सहज उपलब्ध करून देता येते
  • शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ ई पीक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देण्यात येतो .
  • खातेदारांना आणि तुषार सिंचन योजनांचा लाभ कृत्या देणे शक्य होणार आहे
  • या ॲपद्वारे कृषी गणना अत्यंत सुलभ आणि अत्यंत सोप्या पद्धतीने करता येणार आहे
  • खातेदारांना पीक कर्ज देणे पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई इत्यादी पीक पाहणी मुळे शक्य होणार आहे.
  • खात्यानुसार आणि पीक क्षेत्रानुसार यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांकडून देण्यात येत असलेला रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येणार आहे

नवीन ई पीक पाहणी ॲप मध्ये असणाऱ्या सुविधा :

  • Geo Fencing सुविधा
  • स्वयं प्रमाणित शेतकरी ई पीक पाहणी ला मान्यता
  • तलाठी मार्फत किमान 10% तपासणी
  • 48 तासाच्या आत ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
  • नोंदणी सुविधा किमान आधारभूत किंमत
  • इतर 3 मुख्य पीक मिश्र पिकांमध्ये नोंदवण्याच्या सुविधा
  • ई पीक पाहणी संपूर्ण गावाची बघण्याची सुविधा
  • ॲपबद्दल स्वतःचे मत रेटिंग ची सुविधा
  • खाते अपडेट करण्याची सुविधा

E Pik Pahani 2024 ई पीक पाहणी कशी करावी ?

  • आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी वर्जन दोन हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर च्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे लागते
  • आपला जिल्हा निवडा
  • आपला तालुका निवडा
  • आपले गाव निवडा
  • खातेदार किंवा गट नंबर टाका
  • आपला परिचय निवडा
  • पुन्हा होम पेज वर जा
  • पिकाबद्दल माहिती भरा खाते क्रमांक निवडा
  • गट क्रमांक निवडा
  • त्यानंतर हंगाम निवडावा
  • पिकांचा वर्ग निवडावा
  • जमिनीचे एकूण क्षेत्र भरा
  • जर एक पीक असेल तर निर्मळ पीक निवडा किंवा
  • एक पिकापेक्षा जास्त पीक असेल तर बहुतेक निवडा
  • पिकांची नावे लिहा
  • क्षेत्र भरा
  • जलसिंचनाचे साधन भरा
  • सिंचन पद्धत निवडा
  • लागवडीची दिनांक निवडा
  • मुख्य पिकाचे चित्र अपलोड करावे चित्र अपलोड करत असताना आपल्या
  • मोबाईलचा जीपीएस चालू असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर सबमिट करावे

E Pik Pahani 2024 सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता मोबाईल वरून आपल्या सातबारावर विविध पिकांची नोंदणी शक्य झाले आहे सदरच्या ई पीक पाहणी ॲप द्वारे मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण गावांची पीक पाहणी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे राज्याच्या सध्या वापरण्यात येत असलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा समावेश केलेला आहे जेव्हापासून विविध पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आले तेव्हापासून महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी करून घेतली आहे यामध्ये पीक पाहणी शेतकऱ्यांना डाउनलोड करायचे आहे आणि त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे

शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम जिल्हा निवडावा लागतो नंतर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका निवडावा लागतो नंतर आपले गाव निवडून खातेदार किंवा गट क्रमांक निवडून आपला परिचय टाकावा लागतो आणि पुन्हा होम पेजवर जाऊन पिकाबद्दल माहिती भरणे आवश्यक असते त्यानंतर हंगाम निवडावा लागतो पिकांचा वर्ग निवडून एकूण क्षेत्र भरावे लागते. तसेच ची नावे देखील त्यात आवश्यक असतात. त्यात वापरत असणाऱ्या सिंचन पद्धती निवडणे आवश्यक असते. E Pik Pahani 2024 मुख्य पिकाचे चित्र अपलोड करत असताना आपल्या मोबाईलचा जेएसपी चालू व त्यानंतर माहिती सबमिट परत एकदा तपासून पहावे लागते.

ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे ?

  • शेती पण तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये स्टोर ऐप उघडायचे आहे
  • त्यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी असे करायचे आहे
  • त्यानंतर ई पीक पाहणी वर्जन दोन वर क्लिक करायचे आहे
  • त्यावर क्लिक करून इन्स्टॉल वरती क्लिक करायचे आहे. किंवा त्याच्या समोरील लिंक वर क्लिक करूनही तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता

E Pik Pahani 2024

E Pik Pahani 2024 शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी साठी मिळालेला प्रतिसाद :

  • नऊ दशलक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ईपीक तपासणी कार्यक्रमाद्वारे आधीच त्यांच्या नोंद पिकांची नोंदणी करून घेतली आहे 7 दशलक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सातबारा नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे
  • मागील वर्षात 380 पिके खरीप हंगामातील 363 पिके रब्बी हंगामातील आणि उन्हाळी हंगामातील 183 पिकांसह 1926 पिकांची नोंद करण्यात आलेली आहे
  • मागील वर्षात तिच्या आधारे सोयाबीनच्या लागवडीने 2.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र व्यापलेले असून हरभरा पिकाने सुमारे 0.99 दशलक्ष हेक्टर व्यापलेले पहायला मिळत आहे
  • 191 हजार 338 हेक्टर तांदूळ लागवड क्षेत्रफळाच्या महत्वपूर्ण क्षेत्रावर केली गेलेली आहे जे मुख्य पीक म्हणून त्याचे महत्व दिसून येत आहे
  • हे सर्व लक्षात घेण्यासाठी आकडे प्रक्रियांचे लक्षणीय प्रमाण प्रदेशातील पीक लागवडीचे महत्व दर्शवत असल्याचे पहायला मिळत आहे

ई पीक पाहणी पाणीबाबत अजून माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा : vedio credt : marathi support

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

E Pik Pahani 2024 ई पीक पाहणी का करावी ?

या योजनेमधून शेतकरी स्वतःहून शेतीबद्दल किंवा पिकाबद्दल नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागाने मागील वर्षापासून ई पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे

ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे ?

https://play.google.com/store/apps/details?id=io.sceppCordova या लिंक वरून आपण ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करू शकतो

WhatsApp Group Join Now

Leave a Comment