Biyane Anudan Yojana 2024 महाराष्ट्रात पेरणीसाठी खरीप हंगाम सुरू असून हंगामासाठी राज्य सरकार अनुदानावर बियाणे वाटप करणार आहे.गणित पिके व अन्नधान्य या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन जिल्ह्यानुसार पिके व जिल्हा देण्यात आलेला आहे. बियाण्यांसाठी अनुदान राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान यांच्या अंतर्गत देण्यात येणार आहे.ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. आज आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व त्याबद्दल सर्व माहिती पाहणार आहे. याबद्दल सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Biyane Anudan Yojana 2024 राज्यात पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन 2007-8 पासून राबविण्यात येत आहे. बारावी पंचवार्षिक योजनेमध्ये या अभियाना अंतर्गत भात गहू कडधान्य व भरड धान्य पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यांचा समावेश अकराव्या पंचवार्षिक योजनेमधील अभियानाचा आढावा घेऊन करण्यात आला आहे.बारावी पंचवार्षिक योजनेसाठी च्या मार्गदर्शक सूचनानुसार सन 201415 पासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.केंद्र शासनाने 201819 व 2019 20 ही वर्षे पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले होते. यासाठी अनुसरून सन 201819 पासून केंद्र शासनाने काही नवीन अभियानांचा यामध्ये समावेश केला होता.
- भरडधान्य अभियानात बदल करून पूर्वीच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
- केंद्र शासनाने दोन स्वतंत्र असे अभियान राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे
- यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरड धान्य अंतर्गत मका पिक
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-पौष्टिक तृणधान्य अंतर्गत ज्वारी बाजरी वरागी पिकांसाठी स्वतंत्र अभियान सुरू केलेले आहेत.
- अभियानानुसार नव्याने स्वतंत्र या दोन अभियानांसाठी नियतव्यय निर्धारित केलेला आहे
Biyane Anudan Yojana 2024 बियाणे वितरण 2024 :
- वैयक्तिक शेततळे पंप संच पाईप बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन विविध कृषी अवजारे या गोष्टींना बियाणे अनुदान योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देण्यात येणार आहे.
- पंपसंच पाईप, वैयक्तिक शेततळे या घटकांचा लाभ बघण्यासाठी कृपया दस्तऐवज पहावा
- विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ बघण्यासाठी कृपया दस्तऐवज पहावा
- एकात्मिक कीड व्यवस्थापन बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.
Biyane Anudan Yojana 2024 बियाणे अनुदान योजना :
योजनेचे नाव : बियाणे अनुदान योजना | |
योजनेचे कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य | |
जारी करणारा विभाग : कृषी विभाग महाराष्ट्र शासन | |
लाभ : बियाणे | |
लाभार्थी : सर्व शेतकरी | |
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन |
बियाणे अनुदान योजनेसाठी पात्रता :
बियाणे अनुदान योजनेसाठी केंद्र शासनाने पिकांनुसार निवडलेले जिल्हे खालील प्रमाणे आहेत.
- भात -पुणे सातारा नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली इत्यादी एकूण (आठ जिल्हे )
- गहू -नागपूर बीड सोलापूर (तीन जिल्हे )
- भरडधान्य – (मक्का ) सांगली अहमदनगर जालना औरंगाबाद नाशिक धुळे जळगाव एकूण ( सात जिल्हे )
- पौष्टिक तृणधान्य -ज्वारी बाजरी रागी एकूण (26 जिल्हे )Biyane Anudan Yojana 2024
1 ) ज्वारी -नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली औरंगाबाद बीड जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला कोल्हापूर आणि यवतमाळ वाशिम व अमरावती (एकूण 23 जिल्हे )
2 ) बाजरी – जळगाव धुळे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली औरंगाबाद बीड जालना आणि उस्मानाबाद (एकूण 11 जिल्हे )
3 ) रागी – सातारा कोल्हापूर ठाणे (पालघरसह ) रायगड व रत्नागिरी नाशिक आणि पुणे (एकूण 7 जिल्हे )
4 ) कापूस – ( अमरावती विभाग ) – बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ (नागपूर विभाग ) – वर्धा नागपूर आणि चंद्रपूर (एकूण 8 जिल्हे )
5 ) ऊस – (औरंगाबाद विभाग )-औरंगाबाद जालना बीड ( लातूर विभाग )- लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली
मधून वरती नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियांसाठी दहा वर्षांच्या आतील वाणाचे रुपये 25 प्रति किलो आणि दहा वर्षांवरील वानास प्रति रुपये 12 किलो असे दर मिळणार आहेत . वरील सांगितल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे बाजार भाव किंवा दर मिळणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुमचे हरभरा बियाणे जर दहा वर्षांच्या आतील असतील तर या बियाण्यांना 25 रुपये प्रति किलो दर मिळणार आहे . आणि जर आमच्या शेतकऱ्यांचे हरभरा बियाणे दहा वर्षांवरील असतील त्यांच्या बियाण्यांना प्रति 12 किलो रुपये मिळणार आहेत.Biyane Anudan Yojana 2024
बियाणे अनुदान योजना 2024
- जर शेतकरी गहू डाळी कापूस तांदूळ ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकांमध्ये अर्ज करणार असेल तर वरती दिलेल्या प्रमाणे जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील
- कोणत्याही गोष्टींसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे
- आपल्या शेतीसाठी शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- जर लाभार्थ्याला गळीत धान्य पिके यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्याच्या शेतीत गळीत पिके असणे बंधनकारक आहे
- अर्जदार जर वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे बंधनकारक आहे
- संबंधित शेतकऱ्यांचे नाव सातबारा व 8 अ असणे बंधनकारक राहील.
बियाणे अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा प्रमाणपत्र
- आठ प्रमाणपत्र
- खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणांचे कोटेशन असणे आवश्यक
- केंद्र सरकारच्या मान्यता प्राप्त असलेल्या एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील
- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असल्यास लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- हमीपत्र
- पूर्व संमती पत्र
जर तुम्हाला Biyane Anudan Yojana 2024 बियाणे अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरती सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला बियाणे अनुदान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे वरती सांगितल्याप्रमाणे कोणती कागदपत्रे नसतील तर, लवकरात लवकर कागदपत्रांची व्यवस्था करून ठेवायची आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित रहावे लागेल
बियाणे अनुदान योजना – अनुदान मर्यादा अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया :
अनुदान – सर्व बियान साठी 50 टक्के अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे
मर्यादा – शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मुदत दिली आहे
अंतिम तारीख – 31 jully 2024 ही या योजनेची अर्ज प्रक्रिया सादर करण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे
निवड प्रक्रिया – या अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे
वरती सांगितल्याप्रमाणे बियाणे अनुदान योजनेसाठी अनुदान मर्यादा कर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे तुम्ही बियाणे अनुदान योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.Biyane Anudan Yojana 2024
बियाणे लागवड अनुदान अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
Biyane Anudan Yojana 2024 बियाणे लागवड अनुदान विषयी व्हिडिओद्वारे माहिती पहा : Marathi Support
बियाणे खरेदीवर किती अनुदान मिळते ?
बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे.
बियाणे अनुदानासाठी अर्ज कोठे करावा
बियाणे अनुदानासाठी अर्ज महाडीबीटीच्या वेबसाईटवर करावा.