शेतकऱ्यांना मिळणार ठिबक, तुषार सिंचनासाठी 50 % अनुदान; पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया : Tushar thibak sinchan yojana 2024

WhatsApp Group Join Now

tushar thibak sinchan yojana 2024 : शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्यरीत्या करून शेतीमध्ये उत्पादन अधिक मिळवण्याच्या हेतूने राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे . तसेच या योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन ही सुविधा उपलब्ध राज्य सरकार करून देणार आहे . शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत शेतीसाठी पुरविण्यात येणार आहे . पाण्याचा वापर सुरळीतपणे करण्यासाठी ही योजना कार्यरत होते . शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही योजना चालू करण्यात येऊन शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी ही योजना केलेले आहे .

Tushar thibak sinchan yojana 2024

Tushar thibak sinchan yojana 2024 या योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन याचा वापर करून पूरक तेवढेच पाणी पिकाला देऊ शकतो . राज्य सरकार शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक सिंचन बसवण्यासाठी एकूण 80 टक्के अनुदान देणार आहे , म्हणजेच या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना म्हणजेच ज्यांना कमी शेती आहे किंवा ज्यांना जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान आणि पंचवीस टक्के पूरक अनुदान असे 80 टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांसाठी 45 टक्के अनुदान आणि 30 टक्के अनुदान पूरक अनुदान म्हणजे एकूण 75 टक्के या पद्धतीने अनुदान देण्यात येणार आहे .

WhatsApp Group Join Now

शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर कमीत कमी व पिकांना होईल तेवढाच करावा या उद्देशाने राज्य शासनाने निर्णय घेतला . शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे . आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर कमी आणि हवा तितकाच होत असल्याने शेतीही अधिक उत्पन्न घेऊन शेती फुलवण्याच्या दृष्टिकोनाने शेतकरी उत्पादन वाढवू शकतो . शेतकऱ्यांनी योग्यरीत्या आपल्या शेतीत गुंतवणूक करण्यासाठी ही आर्थिक मदत राज्य सरकार देत आहे म्हणून सुमारे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून (Tushar thibak sinchan yojana 2024) ठिबक सिंचन अनुदान योजना 2024 यामार्फत शेतकऱ्यांना सिंचन बसवण्यासाठी एकूण 80 टक्के अनुदान मिळणार आहे .

योजनेचे नावठिबक सिंचन अनुदान योजना 2024 / Tushar thibak sinchan yojana 2024
कोणा द्वारे सुरू करण्यात आली ? ही योजना राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे .
योजनेचा उद्देश काय ? या योजनेचा मुख्य उद्देश कमी पाण्यात पिकांचे सिंचन करणे असा आहे .
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्वशेतकरी
लाभ सिंचन बसवण्यासाठी एकूण 80 टक्के अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

तुषार ठिबक सिंचन योजनेबद्दल माहिती…

  • शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सिंचना ची सुविधा उपलब्ध करून पाण्याचा हवा तितका वापर व्हावा या हेतूने राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुषार ठिबक सिंचन योजना सुरू केली .
  • शेताच्या पिकासाठी सतत पाण्याची आवश्यकता असते . महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोक किंवा 70 टक्के लोक हे शेती वर्षानुवर्ष चालत आलेला एक पारंपारिक व्यवसाय आहे असे म्हणतात . जेव्हा एखाद्या शेतकरी शेती करतो तेव्हा त्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी म्हणूनच पाण्याचा योग्यरित्या वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना हे अनुदान जाहीर केले . काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पिकांना पाणी दिलं मुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते , तसेच पाणी जास्त प्रमाणात मिळाल्याने देखील पिकांना अयोग्य ठरू शकते त्यामुळे पाणी वाया गेल्यामुळे काही काळानंतर पाण्याची टंचाई निर्माण होते .
  • म्हणूनच राज्य सरकारने या सर्व समस्यांचा विचार करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी चांगल्या प्रकारे पाणी मिळावे आणि पाण्याची बचत देखील व्हावी . पिकांना चांगले पोषण मिळावे पीक भरभरून यावे यादृष्टिकोनाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत व्हावे तसेच शेतकऱ्यांनी अनेक यंत्राचा व तंत्राचा वापर करावा या हेतूने तुषार ठिबक सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला .

Tushar thibak sinchan yojana 2024

Tushar thibak sinchan yojana 2024 तुषार ठिबक सिंचन योजनेच्या अटी व शर्ती :

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे . तरच तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो .
  2. महाराष्ट्र राज्य सोडून जर तो शेतकरी इतर राज्यातील असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे 7/12 आणि 8 चा उतारा याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा एससी ,st या प्रवर्गातील असेल तर त्याच्या जातीचा दाखला असणे आवश्यक आहे .
  5. समजा अर्जदार शेतकऱ्याने 2017 च्या सालच्या अगोदर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुढचे दहा वर्षे त्या सर्वे नंबर वरती लाभ दिला जाणार नाही .
  6. त्याचप्रमाणे जर अर्जदार शेतकऱ्यांनी 2018 नंतर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर शेतकऱ्याला पुढची सात वर्षे लाभ घेत येणार नाही .
  7. अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याच्या इलेक्ट्रिक पंपासाठी कायमस्वरूपी चे बीज कनेक्शन असणे आवश्यक आहे . पुरावा म्हणून वीज बिलाची प्रत सादर करणे आवश्यक असते .
  8. लाभार्थी शेतकऱ्यांना पाच हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्या शेतीत योजनेचा लाभ घेता येईल .
  9. तसेच एखाद्या शेतकरी पूर्व मान्यता मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये सूक्ष्म संच बसवलं नाही तर त्या शेतकऱ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  10. म्हणूनच शेतकऱ्याने पूर्व मान्यता न घेता सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी अर्ज केला असल्यास अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही . तसेच या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाईल .

तुषार ठिबक सिंचन योजनेचा उद्देश :

  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा वापर ठिबक सिंचन सुविधा द्वारे होण्यासाठी ही आर्थिक मदत राज्य शासनाने केली आहे . महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी यांना ही मदत पुरवणे हा मुख्य उद्देश आहे .
  • शेतकऱ्यांच्या शेतातील काम जलद गतीने व्हावे तसेच सिंचन अभावी शेतातील पिकांचे अति पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करणे या उद्देशाने ही योजना ठरविण्यात आली .
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्र विषयी अधिक माहिती होऊन त्या तंत्रांचा वापर करून शेतीउत्तमपणे करण्यासाठी ही योजना आखण्यात आली .
  • शेतीमध्ये पाण्याचा योग्य तितका व हवा तितका वापर करून पाण्याची क्षमता पाहून जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन करणे म्हणजेच कमी पाण्यामध्ये जास्त पिकाचे उत्पादन करणे .
  • शेतकऱ्यांच्या शेती या क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे .

आता मिळणार मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप ; योजनेची पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

Tushar thibak sinchan yojana 2024 benefits तुषार ठिबक सिंचन योजनेचे फायदे :

  • शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन प्रमाणे आर्थिक अनुदान पुरवले जात आहे .
  • शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न घेत शेती करणे शक्य होणार आहे .
  • पाण्याचा अति वापरतात तेव्हा ठिबक सिंचन प्रणाली द्वारे पाण्याचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत होणार आहे .
  • शेती या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्षेत्राचा विकास होणार आहे .
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल .

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

Tushar thibak sinchan yojana 2024 Documents :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • तीन महिने अगोदरचे वीज बिल
  • जमिनीचा 7/12 आणि 8 अ चा उतारा
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • शेतकऱ्यांचे पूर्वसंमती पत्र

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी असा करा अर्ज …

Tushar thibak sinchan yojana 2024 how to apply :

  • तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज असतो . सगळ्यात अगोदर तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जावे लागेल .
  • अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर होम पेज वरती शेतकरी योजना यावर क्लिक करावे .
  • यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हालाusername विचारला जाईल तो टाकल्यानंतरcaptcha टाकून लॉगिन करा .
  • त्यापुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला सिंचन साधने व सुविधा यासमोर ऑप्शन वरती क्लिक करावे .
  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होऊन त्यामध्ये सिंचन स्त्रोत बद्दल विचारलेली योग्य ती माहिती निवडून जोडा या बटणावर क्लिक करा .
  • जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक सिंचन साधने व सुविधा अर्ज ओपन झाला तर त्यात तुम्हाला विचारलेली सर्व योग्य ती माहिती भरायचे आहे आणि जतन या बटनावरती क्लिक करायचे .
  • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल येथे तुम्हाला फक्त 23/- रुपये भरावे लागतील . अशा पद्धतीने तुम्ही तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकता .

महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन अनुदान अर्ज करण्यासाठी : महाडीबीटी ऑफिशियल वेबसाईट.

ठिबक सिंचन योजनेबाबत व्हिडिओद्वारे माहिती पाहण्यासाठी : Video Credit Helping Farmers

वरील वेबसाईटवर जाऊन शेतकरी सर्व योजनेसाठी अर्ज करू शकतात या मार्फत फॉर्म भरून शेतकरी अनुदान घेऊ शकतात.

FAQ :

ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • तीन महिने अगोदरचे वीज बिल
  • जमिनीचा 7/12 आणि 8 अ चा उतारा
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • शेतकऱ्यांचे पूर्वसंमती पत्र

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज महाडीबीटीच्या वेबसाईटवर करावा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment