Digital Crop Sarvekshan 2024 राज्यांमधील ई पीक पाहणी अधिक अचूक व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजिटल क्रॉप सर्वेक्षण प्रकल्प सुरू केले आहे या प्रकल्पामुळे सरकारला अधिक अचूक माहिती मिळणार आहे राज्यांमधील पेरण्यांची नोंद सातबारा वरती ऑनलाईन करण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे पण अनेकदा शेतामध्ये शेतकरी न जाता किंवा चुकीची नोंदणी करून ई पीक पाहणी करतात त्यामुळे अधिक अचूकतेने केंद्र सरकारने डिजिटल क्रॉप सर्वेक्षण सुरू केले आहे.
सध्या डिजिटल क्रॉप सर्वेक्षण आणि ई पीक पाहणी जवळपास सारखेच आहेत मात्र डिजिटल क्रॉप सर्वेक्षण करत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या गट हद्दीमध्ये जाणे बंधनकारक आहे त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आहे.
1 ऑगस्ट पासून या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास
Digital Crop Sarvekshan 2024 राज्यांमधील 34 जिल्ह्यातील 34 तालुक्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वेक्षण प्रकल्प राबवले जात आहे त्यामध्ये 2858 गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना लाईव्ह लोकेशन ट्रॅक करून हद्दीत जाऊन पिकांचा फोटो अपलोड करावा लागणार आहे.
Digital Crop Sarvekshan 2024 तालुका नुसार यादी :
या 34 जिल्ह्यातील 34 तालुक्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वेक्षण प्रकल्प राबवले जात आहे.
- अमरावती
- बुलढाणा
- यवतमाळ
- वाशिम
- छत्रपती संभाजी नगर
- धाराशिव
- जालना
- नांदेड
- परभणी
- बीड
- लातूर
- हिंगोली
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
- रायगड
- नागपूर
- गडचिरोली
- भंडारा
- चंद्रपूर
- गोंदिया
- नाशिक
- अहमदनगर
- जळगाव
- धुळे
- नंदुरबार
- अकोला
- पुणे
- सांगली
- कोल्हापूर
- सातारा
- सोलापूर
- वर्धा
- ठाणे
- पालघर
ई पिक पाहणी करा तरच मिळेल पिक विमा !!