या योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना 7 लाखांचे अनुदान , पहा योजनेची सविस्तर माहिती : Atal Bambu Lagvad Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Atal Bambu Lagvad Yojana 2024 भारत हा शेतीप्रधान देश असून देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 75 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते अशाच एका नवीन योजनेबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अटल बांबू समृद्धी योजना ही योजना महसूल विभागाच्या रोजगार हमी योजना विभागाद्वारे राबवली जात आहे.

Atal Bambu Lagvad Yojana 2024

योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

  • शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन वर्षापर्यंत 6 लाख 90 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते
  • हे अनुदान रोपे आणि मजुरीच्या स्वरूपात दिले जाते
  • सध्याच्या पावसाळी हवामानामध्ये बांबू लागवडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे

WhatsApp Group Join Now

Atal Bambu Lagvad Yojana 2024 अर्ज प्रक्रिया :

  • इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजने कडे अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्ज केल्यानंतर रोजगार हमी योजना विभागाकडून अंतिम निवड केली जाईल

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी मिळते 100 % अनुदान

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • शेतकरी असल्याचा सातबारा उतारा
  • आठ अ उतारा
  • बँक पासबुक

योजनेची व्याप्ती :

  • वैयक्तिक शेतकरी
  • शेतकरी उत्पादक कंपन्या
  • संस्था समूह
  • शासकीय जमिनीवर ही बांबू लागवड करता येते

रोपे उपलब्धता :

  • वनविभागाने यावर्षी 14 लाख 67 हजार 50 विविध प्रकारची बांबूची रोपे तयार केली आहेत
  • हे सर्व रोपे पंधरावा रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आले आहेत
  • सवलतीच्या दरामध्ये ही रोपे विकली जात आहेत

बांबू लागवडीचे फायदे :

1 ) कमी पाण्यामध्ये वाढणारे पीक : बांबूला पाण्याची गरज कमी असते त्यामुळे दुष्काळी भागामध्ये सुद्धा याची लागवड करता येते

2 ) बहुपयोगी : बांबूचा वापर फर्निचर कागद उद्योग बांधकाम क्षेत्र अशा विविध उद्योगांमध्ये केला जातो

3 ) जलद वाढ : बांबू हे अतिशय वेगाने वाढणारे झाड आहे त्यामुळे लवकर उत्पन्न मिळते

4 ) मृदा संधारण : बांबूंच्या मुळांमुळे जमिनीची धूप थांबते आणि मातीचे संरक्षण होते

5 )कार्बन शोषण : बांबू हे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता असलेली झाड आहे त्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होते

योजनेची अंमलबजावणी :

Atal Bambu Lagvad Yojana 2024 महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य दिले जात आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध शासकीय विभागात एकत्रितपणे काम करत आहे. अटल बांबू समृद्धी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षण ही मिळणार आहे

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याची एक चांगली संधी आहे सरकारने राबवलेल्या या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे जीवन मनामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.Atal Bambu Lagvad Yojana 2024

महिलांसाठी आनंदाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात

WhatsApp Group Join Now

Leave a Comment