अर्थसंकल्पात मोठी घोषणा !! 300 युनिट पर्यंत मोफत वीज , असा करा अर्ज : Mofat Vij Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Mofat Vij Yojana 2024 अर्थमंत्र्यांनी आज बजेट सादर करत असताना एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते शुभारंभ झालेल्या योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे जाणून घ्या.

Mofat Vij Yojana 2024

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आलेल्या अर्जांची त्यांनी माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगितले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख कर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेमधून तुम्हाला 300 युनिट पर्यंत मोदी सरकारच्या मोफत वीज मिळणार आहे ही योजना काय आहे. जाणून घेऊ.Mofat Vij Yojana 2024

WhatsApp Group Join Now

अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना :

Mofat Vij Yojana 2024 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशांमधील सुमारे 1 कोटी कुटुंबांना प्रति महिना 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सूर्य मोफत वीज योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सौर पॅनल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सूर्य मोफत वीज योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनल विकत घेतले तर सरकार एक किलो वॅटच्या सौर पॅनलवर 30,000 रुपये, 2 किलो वॅटच्या सौर पॅनल वरती 60000 आणि 3 केजी सौर पॅनल जास्तीत जास्त 78 हजार रुपये अनुदानाची रक्कम दिली जाते.

Mofat Vij Yojana 2024 या योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • अधिकृत पोर्टल वरती जाऊन होम पेज वर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुम्हाला राज्य निवडण्याचा पर्याय मिळेल, यामध्ये तुमचे राज्य निवडावे लागेल.
  • तुम्ही तुमची वीज वितरण कंपनी निवडा. आता त्यामध्ये तुमचा मोबाईल आणि ग्राहक क्रमांक टाका.
  • यानंतर मोबाईलवर मिळालेला ओटीपी टाका आणि कॅपच्या कोड भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा सौर पॅनल साठी अर्ज सरकारकडे जमा होणार आहे.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना तुमच्याकडे आधार कार्ड ,मोबाईल नंबर ,विजबिल ,रेशन कार्ड, उत्पन्न दाखला ,आणि फोटो ,प्रतिज्ञापत्र ,आणि रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

या तारखेपासून ई पीक पाहणी करण्यास सुरुवात 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment