Pik Vima Arj 2024प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपया मध्ये पिक विमा भरण्याची आज 15 जुलै ही अंतिम मुदत होती. परंतु राज्यातील अनेक शेतकरी अजूनही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्यामुळे संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ करावे अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारला करण्यात आले आहे. त्यामुळे विमा अर्जासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोणत्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची कॉमन सर्विस सेंटर केंद्रावर ती गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज आणि लागणारे कागदपत्रे जोडत असताना सर्वर गती मंद झालेली आहे. अजूनही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे पिक विमा चा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. याप्रमाणे आता शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येणार आहेत.
कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर
Pik Vima Arj 2024 पिक विमा अर्ज 2024 :
कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत म्हणजेच 15 पिक विमा अर्ज सकाळ पर्यंत एक कोटी 36 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केले आहेत. राज्यामध्ये अनेक भागांमधून मान्सूनचा पाऊस उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. मुदतवाढ त्यामुळे या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यातील जवळपास एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. तर मागील हंगामामध्ये एक कोटी 13 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. यावर्षी जास्तीत जास्त क्षेत्र विमा संरक्षित करण्याचे ध्येय कृषी विभागाने ठेवलेले आहे.
22 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज केला नसेल तर या लिक्वद्वारे तुम्ही अर्ज करू शकता : https://pmfby.gov.in/