पी एम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार प्रतिवर्ष 36,000 रुपये : PM Kisan mandhan Yojana 2024

WhatsApp Group Join Now

PM Kisan mandhan Yojana 2024 केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा त्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असते. आत्ताही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना निर्माण केली आहे ज्याचे नाव किसान मानधन योजना आहे. हा सर्व विचार केंद्र सरकारने केंद्रस्थानी ठेवून “पीएम किसन मानधन योजना” सुरू केली आहे. केंद्र सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केले असून या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या योजनेबद्दल सविस्तर सर्व माहिती आज आपण आपल्या या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचून अत्यंत आवश्यक आहे.

 PM Kisan mandhan Yojana status 2024

PM Kisan mandhan Yojana 2024 शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार व शेतकऱ्यांकडे किती प्रमाणात शेत जमीन आहे यानुसार त्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रकमेचा हप्ता भरणे आवश्यक आहे भारतामध्ये जवळजवळ 60 ते 70 टक्के लोक हे प्राथमिक व्यवसायात म्हणजे शेती व्यवसायात गुंतलेले असतात. त्यामुळे आपल्या देशाला कृषीप्रधान देश असे म्हणून ओळखले जाते. यासाठी 60 ते 70 टक्के लोकांमध्ये बहुतांश शेतकरी असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते किंवा ते आर्थिक अडचणींमध्ये सापडले असतात. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही नवीन योजना सुरू केलेली आहे जेणेकरून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढता यावे.

WhatsApp Group Join Now

PM Kisan mandhan Yojana 2024 पी एम किसान मानधन योजना :

भारतामध्ये शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना वृद्धकाळात त्यांच्या शारीरिक त्रासामुळे त्यांना शेतामध्ये कष्ट करता येत नाही. त्यामुळे वृद्ध लोकांना मदत करणे हा हेतू केंद्र सरकारने लक्षात घेऊन त्यांना मदतीचा आधार मिळावा यासाठी पीएम किसान मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

राज्य सरकारने पी एम किसान मानधन योजना सुरू केली असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्ध वयात निवृत्ती वेतन देणे ज्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला थोडासा हातभार लावू शकतील. त्यांच्या कुटुंबांना थोडासा आर्थिक एक आधार देऊ शकते ज्यामुळे ते रोजच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागू शकतील आणि त्यांना रोधकाळात कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून न राहता आपले वृद्धपणातील जीवन व्यवस्थित आणि आरामदायी पद्धतीने जगू शकतील.

PM Kisan mandhan Yojana 2024 शेतकऱ्यांना प्रति महिना 3000 रुपये देण्याचे आवाहन :

PM Kisan mandhan Yojana status 2024 पी एम किसान मानधन योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सारखी उज्वल भविष्याचा विचार करून राबवलेली पाहायला मिळते. या योजनेमध्ये साठवळ्यांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमधून आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केलेले दिसून येते. जे शेतकरी आता शेतीमध्ये काम करत असतात त्या शेतकऱ्यांना आपल्या वृद्धकाळात शारीरिक अडचणीमुळे आणि त्रासामुळे शेतीची कामे करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार रकमेच्या स्वरूपात महिन्याला आर्थिक पाठबळ देणार आहे. हा विचार केंद्र सरकारने केंद्रस्थानी ठेवून पीएम किसान मानधन योजना सुरू केल्याचे पाहायला मिळते. ही योजना 12 सप्टेंबर 2011 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली होती.

ज्याचा मुख्य उद्देश ज्या शेतकऱ्यांना लहान शेत जमीन आहे म्हणजेच जे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना मानधनाच्या स्वरूपात त्यांना वृद्धकाळात आपले जीवन आरामदायी व सुखकारक जगता यावे हा आहे. या योजनेमध्ये म्हणजेच पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महिना तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. तसेच लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांचे काही जीवितहानी झाली असल्यास म्हणजेच दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांच्या पत्नीस तर महिना 1500 रुपये दिले जातात.

पी एम किसान मानधन योजनेमध्ये पात्र होण्याचे निकष :

  • पी एम किसान मानधन PM Kisan mandhan Yojana 2024 योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे 18 ते 40 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या योजनेमधून देण्यात येणारे मानधन केवळ लाभार्थी शेतकरी आणि त्याच्या पत्नीस दिले जाते.
  • दुर्दैवाने जर शेतकऱ्याच्या जीवाचं काही बरे वाईट झालं , तर पती किंवा पत्नीस मानधनाच्या 50 टक्के रक्कम दिली जाते.
  • शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यांना या मानधन योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.
PM Kisan mandhan Yojana 2024

PM Kisan mandhan Yojana 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मतदान ओळखपत्र
  • वयाचा दाखला

इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्ज करणारे शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.

कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज सुरू , अनुदानासाठी संमती पत्र बंधनकारक

या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ व फायदे :

PM Kisan mandhan Yojana 2024 या योजनेमुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे होणाऱ्या त्रासातून कायमची मुक्तता मिळणार आहे. शेतकऱ्यांना आता कोणत्याही गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. या योजनेमधून 55 ते 60 वर्षाच्या वरील शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजने मधून हजार रुपये दर महिन्याला तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये मानधन मिळणार आहे. या योजनेमध्ये 50 टक्के रक्कम केंद्र शासन देत आहे.

PM Kisan mandhan Yojana 2024 या योजनेमधून दर महिन्याला मिळणारे मानधन हे त्यांना आयुष्यभरासाठी देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर त्या पत्नीला किंवा पत्नीला रुपये दीड हजार रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पात्रता ही फक्त ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर शेत जमीन म्हणजेच पाच एकर क्षेत्र असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ दोन हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही. केवळ 18 ते 40 या वयोगटातील शेतकऱ्यांना मानधन योजनेसाठी अर्ज नाव नोंदणी करता येऊ शकते. तरी या शेतकऱ्यांना दर महिन्याला 55 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये याप्रमाणे होते भरावे लागणार आहेत तर त्यांना 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत.

या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी नाव नोंदणी करू शकतात यांना फक्त महिन्याला 55 रुपये भरावे लागणार आहे. यानंतर त्या शेतकऱ्याचे वय 60 पूर्ण झाल्यानंतर त्याला दर महिन्याला तीन हजा3000 रुपये एवढे रक्कम पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. या रकमेचा उपयोग दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तो शेतकरी करू शकतो.

PM Kisan mandhan Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा ?

PM Kisan mandhan Yojana 2024 ज्या शेतकऱ्यांना पीएम किसन मानधन योजनेत मधून लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेतू कार्यालयात म्हणजेच ई सेवा केंद्रात जाऊन आपले नाव नोंदणी करून घ्यायची आहे. वरती सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहेत. तिथे गेल्यानंतर व्यक्ती तुम्हाला किसान मानधन योजनेचा अर्ज व नोंदणी करून देतील व पोर्टल वरती तो तुमचा अर्ज सबमिट करतील. तिथे जाताना तुम्ही वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचा अर्ज सबमिट होईल तेव्हा ते तुम्हाला भरावयाच्या हप्ता बद्दल व त्याच्या रकमेबद्दल सर्व व्यवस्थित माहिती देतील. अर्ज करून झाल्यानंतर ते तुम्हाला त्या अर्जाची एक झेरॉक्स कॉपी देतील. अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता.

पी एम किसान योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://maandhan.in/

पी एम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit Agricola

FAQ

पी एम किसान मानधन योजनेतील मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

वृद्ध लोकांना मदत करणे हा हेतू केंद्र सरकारने लक्षात घेऊन त्यांना मदतीचा आधार मिळावा यासाठी पीएम किसान मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पी एम किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मतदान ओळखपत्र
  • वयाचा दाखला

पी एम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेतू कार्यालयात म्हणजेच ई सेवा केंद्रात जाऊन आपले नाव नोंदणी करून घ्यायची आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment