नर्सरी व्यवसायामध्ये कोरडे कुटुंबीयांना मिळाले मोठे यश; पहा या कुटुंबाची यशोगाथा : Narsari Vyavsay 2024

WhatsApp Group Join Now

Narsari Vyavsay 2024 पुरंदर तालुक्यामधील सिंगापूर हे प्रकल्प पाऊस पडणारे गाव आहे. अंजीर सीताफळ आणि तिरका हे तेथील प्रमुख पिके आहेत. पुरंदरच्या सीताफळ आणि अंजीर या पिकांना भौगोलिक मानांकन मिळाल्याने येथील शेतकऱ्यांना जगात ओळख मिळाली आहे. पण येथीलच कोरडे कुटुंबीयांनी पारंपारिक पिकांची शेती न करता जोड व्यवसाय करण्याचा संकल्प केलेला आहे.

Narsari Vyavsay 2024

साधारणपणे 2017 मध्ये त्यांना पेरूची लागवड करायची होती. यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामधून पेरूची रोपे आणली परंतु त्यावेळी त्यांना खात्रीशीर रोपे मिळालेली नाहीत ज्या प्रकारे फसवणूक झाली आहे त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे अशा प्रकारे फसवणूक होऊ नये असा विचार करून कोरडे यांनी आपणच खात्रीशीर फळझाडांच्या नर्सरी सुरू करू असा विचार केला. मागील वर्षी त्यांनी एका छोट्या शेड मधून नर्सरीला सुरुवात केली होती.

WhatsApp Group Join Now

Narsari Vyavsay 2024पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे अगदी थोडी झाडे विक्रीसाठी होती. यानंतर त्यांनी एक एक शेतकऱ्यांना नर्सरी विषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू विक्री वाढत गेली आणि खात्रीशीर रोपे असल्या कारणाने ग्राहकांमध्ये विश्वासही वाढत गेला. विक्री वाढल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या वानांची रोपे आणण्यास सुरुवात केली होती.

तुरीचे बाजारभाव घसरले.. पहा राज्यातील बाजार समिती मधील तुरीचे बाजार भाव

(Narsari Vyavsay 2024) विविध राज्यांमधून रोपांची खरेदी :

ज्या शेतकऱ्यांना फळांची रोपे देत आहोत ते खात्रीशीर असायला हवे या उद्देशाने कोरडे कुटुंब यांनी थेट केरळ मधून खात्रीशीर नारळांची खरेदी केले होते .पेरू, मसाल्यांची झाडे ,आणि अजूनही विविध रोपे पेपर राज्यांमधून खरेदी करत, त्याचबरोबर झाडांचा डेमो प्लॉट आहे त्यांच्याकडे पाहायला मिळतो.

Narsari Vyavsay 2024

खात्रीशीर रोपांमुळे ग्राहकांचा विश्वास :

कोरडे कुटुंबीयांच्या साई हायटेक नर्सरी मधून घेतलेल्या रोपांची खात्री असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढलेला आहे. तेथून आणलेले एकही रोप आतापर्यंत वाया गेलेले नाही ,किंवा त्याला फळ लागले नाही अशी ही तक्रार शेतकऱ्यांकडून कोरडे कुटुंबियांकडे आलेली नाही.

(Narsari Vyavsay 2024) रोपातील विविधता :

फक्त नारळ ,आंबा ,अंजीर, सीताफळ, पेरू ,डाळिंब, अशी फळझाडे नाहीत . जी फळझाडे सामान्य शेतकऱ्यांना माहित नव्हती अशा फळझाडांची उपलब्धता त्यांनी केली. यांच्याकडे आंब्याचे 20 प्रकारचे वाण उपलब्ध होते. रुद्राक्ष , स्टार फ्रूट एवाकोडा ,मसाले ,काळीमिरी ,जपानी पर्पल आंबा, बारमाही फळे देणारे आंबा ,काळा आंबा, अशा भरपूर आणि विविध रोपांची उपलब्धता या नर्सरी मध्ये केलेली आहे.

सेंद्रिय खते आणि तंत्रज्ञान यांचा वापर :

नर्सरीमध्ये प्रत्येक रोपासाठी सेंद्रिय खत दिले जाते. सुभाष पाळेकर कृषी पद्धतीप्रमाणे इथे एकाही रोपाला रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. या दरम्यान मजुरांची अडचण असल्यामुळे त्यांनी नर्सरीमध्ये स्वयंचलित फॉगर सिस्टम बसवलेली आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये एका मजुराचे पैसे बचत होण्यास मदत होते.

कुटुंबाची भक्कम साथ :

या व्यवसायामध्ये माऊली कोरडे (वडील), (मुलगा) संजय कोरडे, आणि महेश कोरडे (मुलगा), हे तिघेही या व्यवसायामध्ये जोमाने काम करत. व्यवसायाच्या कामांमध्ये घरातील महिला आणि लहान मुलेही जास्त काम करतात. संजय कोरडे हे नोकरी करतात आणि सुट्टीच्या दिवशी नर्सरी वरती काम करतात. याबरोबरच नर्सरीच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगची सर्व कामे संजय करतात.

उत्पन्न :

या पारंपरिक शेती मधून वर्षाला दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न कोरडे कुटुंब घेतात. नर्सरी व्यवसाय मधून खर्च वजा करून 10 ते 12 लाख रुपयांचा नफा होतो. यामध्ये काटेकोर नियोजन केल्यामुळे चांगला नफा मिळतो असे कोरडे कुटुंबीय सांगतात. ग्राहकांना खात्रीची रोपे देणे, एकदा आलेले ग्राहक पुन्हा रोपे खरेदीसाठी आपल्याकडेच आले पाहिजेत या उद्देशाने सेवा देणे हे साई हायटेक नर्सरीचे यश आहे असे कोरडे कुटुंबीय सांगतात.

सरकार बंद करणार का पिक विमा योजना ? 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment