Havaman Badal 2024 वाढते प्रदूषण आणि कार्बनच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत चालले आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्य, वातावरण आणि शेती क्षेत्रावर ती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना पाहायला मिळतो . दरम्यान हवामान बदलाचे विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर ती मोठ्या प्रमाणात होत असून, हे दुरगामी परिणामी येणाऱ्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणारे असू शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. मागच्या पाच मधील हवामान बदलाचा फटका लहान शेतकऱ्यांना झाल्याचे अहवालानुसार समोर आले आहे.
फोरम ऑफ इंटरप्राईजेस फॉर इक्विटेबल डेव्हलपमेंट ने डेव्हलपमेंट इंटेलिजन्स च्या सहाय्याने जारी केलेल्या अहवालाप्रमाणे गेल्या पाच वर्षांमध्ये हवामान बदलामुळे विपरीत परिणाम देशांमधील 60% पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांवर ती झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर ती आणि पिकांवर ती मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो.Havaman Badal 2024
महावितरण अंतर्गत 5300 जागांसाठी मेगा भरती 10 पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी
Havaman Badal 2024 हवामान बदलाचे विपरीत परिणाम :
हवामानातील बदलामुळे एका वर्षामध्ये दुष्काळ आणि दुसऱ्या वर्षामध्ये पूर अशा परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरितगृह वायू हे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे प्रादेशिक हवामान पद्धतीमध्ये बदल होत आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकरी पीक विमा आणि पीक कर्ज या संविधान पासून लांब असल्याचे सांगण्यात येत आहे.
एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले भारताच्या कृषी क्षेत्रा सर्वात मोठा भाग आहेत. मात्र या शेतकऱ्याकडे फक्त 24% पिकाखालील क्षेत्र आहे. 41 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. तर 33% शेतकऱ्यांना अतिवृष्टी, बिगर मोसमी पाऊस आणि पुराचा सामना करावा लागतो.
अहवालानुसार 50% शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असलेल्या भात पिकांचे किमान अर्धी नुकसान अनुभवले आहे. 42 टक्के शेतकऱ्यांना गहू पिकांच्या नुकसानीचा फटका बसलेला आहे. तांदूळ भाजीपाला आणि कडधान्य या पिकांवर पावसाच्या असमान वितरणाचे विपरीत परिणाम होतो. सरकारची धोरणे शेतकऱ्यांसाठी अनुकूल नाहीत. देशांमधील 30% शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध झाला असून फक्त 25% शेतकऱ्यांना वेळेवरती कर्ज मिळते असे अहवालानुसार समोर आले आहे. हवामानातील या बदलामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये जास्त पाऊस आणि महाराष्ट्र, तेलंगणा ,आंध्र प्रदेश, छत्तीसगड ,बिहार ,आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तुलनेत कमी पाऊस होतो. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ‘या बदलामुळे अन्न सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती बिघडते’ असे मत FEED अध्यक्ष संजीव यांनी व्यक्त केले आहे.
फक्त याच कुटुंबांना मिळणार राशन, पहा काय आहेत नवीन नियम