ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान; जिल्ह्यानुसार याद्या पहा : Dushkali Anudan Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Dushkali Anudan Yojana 2024 : 2023 मधील खरीप दुष्काळ अनुषंगाने पाच लाख 19 हजार 849 बाधित यांना 689 कोटी अनुदान महसूल आणि वन विभाग यांच्याकडील 29 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे मंजूर झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कोणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे.

Dushkali Anudan Yojana 2024

महाराष्ट्रामध्ये ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी 10 जुलै 2024 पर्यंत सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. सध्या बार्शी तालुक्यामधील 3550, माढा तालुक्यामधील 3240, करमाळा तालुक्यामधील 1970, आणि सांगोला तालुक्यामधील 3678, माळशिरस तालुक्यामधील 542 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे 21 कोटी 65 56 हजार 495 प्रलंबित आहे.

WhatsApp Group Join Now

तसेच सोलापूर जिल्ह्यामधील साधारणपणे एक लाख खातेदारांना त्यांच्या बँक आणि आधार कार्ड संलग्न केले नसल्यामुळे, सामायिक खातेदारांची कोणत्याही खात्यावरती रक्कम जमा करावी, याबद्दल संमती पत्र दिले नसल्यामुळे, मृत खातेदारांची वारस नोंद केले नसल्यामुळे, याबरोबरच परगावी खातेदारांचे बँक तपशील, आधार कार्ड तपशील, इत्यादी माहिती उपलब्ध न झाल्यामुळे अनुदान वाटप प्रलंबित केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणार 3000 रुपये

ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही आशा खातेदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांच्याकडे 10 जुलै 2024 याआधी संपर्क साधायचे आवाहन प्रसिद्ध पत्रकामध्ये केलेले आहे.

 Dushkali Anudan Yojana 2024

(Dushkali Anudan Yojana 2024) शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर :

बार्शी माढा करमाळा सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश झालेला आहे. बार्शी तालुक्यामधील 3135 शेतकरी, माढा तालुक्यामधील 76 हजार 724 शेतकरी, करमाळा तालुक्यामधील 72 हजार 113 बाधित शेतकरी, सांगोला तालुक्यामधील 75 हजार 616 बाधित शेतकरी, आणि माळशिरस तालुक्यामधील 77 हजार 951 बाधित शेतकरी, यांना आर्थिक मदत निधी वितरित करावी यासाठी तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ही पंचनामा पोर्टल वरती अपलोड केलेली आहे. या यादीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन पिक विमा जमा होण्यास सुरुवात.. हेक्टरी 16,000 रुपये मिळणार

3 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत :

बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ते थेट आर्थिक मदत रक्कम जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यामधील 21 हजार 252, माढा तालुक्यामधील 64 हजार 871, करमाळा तालुक्यामधील 62 हजार 859, सांगोला तालुक्यामधील 64 हजार 650, आणि माळशिरस तालुक्यामधील 63 हजार 792, असे एकूण 2 लाख 77 हजार 424 बाधित असणाऱ्या सर्व 489 कोटी रकमेचा आर्थिक मदतीचा लाभ दिलेला आहे.

दुष्काळी अनुदान यादी येथे पहा : https://mh.disastermanagement.mahait.org/login

WhatsApp Group Join Now

Leave a Comment