राज्यात 106% पाऊस, परंतु पेरणी 56 टक्केच; पहा कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस : Mansoon Andaj 2024

WhatsApp Group Join Now

Mansoon Andaj 2024 पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण पावसाच्या सरासरी 106 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. एक जुलै 2024 पर्यंत राज्यामध्ये सरासरी 458.4% मिलिमीटर पावसाची नोंद होत असते, परंतु प्रत्यक्षामध्ये 485.10 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.

Mansoon Andaj 2024

राज्यात जून महिन्यामध्ये 160 टक्के पाऊस झाला असला तरी या तुलनेत पेरण्या केवळ 56% झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. पाऊस न झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत.

WhatsApp Group Join Now

राज्यात जून मधील पावसाची सरासरी 207.6 असून, प्रत्यक्षात 221.4 मिलिमीटर म्हणजेच 106.65 पाऊस झालेला आहे. संभाजीनगर विभागामध्ये सर्वात जास्त 136 टक्के पाऊस झालेला आहे. त्याखाली नाशिक विभागामध्ये 114 , आणि अमरावती विभागामध्ये 110 टक्के पाऊस झालेला आहे. नागपूर विभागामध्ये सर्वात कमी 70% झाला आहे. एकूण सरासरी क्षेत्राच्या 56% पेरण्या झालेले आहेत. सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत 30 लाख 97 हजार 917 हेक्टर वरती, म्हणजेच सरासरीच्या 75 टक्के झाले आहे. 27 लाख 69 हजार 671 हेक्टर म्हणजेच 66 टक्क्यांवरती कापूस पिकाची पेरणी पोहोचली आहे.(Mansoon Andaj 2024)

Mansoon Andaj 2024मराठवाडा आणि विदर्भामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याने सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या पेरण्या जास्त झालेले आहेत. या तुलनेत कोकण मध्ये पाऊस जास्त झाला असला तरी, असमान वितरण यामुळे भात खाचरात अजूनही प्रेरणा झाल्या नाहीत. आतापर्यंत फक्त आठ टक्के क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झाली आहे.

Mansoon Andaj 2024

(Mansoon Andaj 2024)कापूस सोयाबीन आणि मक्याची पेरणी 5 लाख 88 हजार 452 हेक्टर वरती झाले असून, सरासरीच्या 66% इतके आहे. मान्सून वेळेमध्ये दाखल झाल्यामुळे मूग , उडीद, या कडधान्य पिकांच्या पेरण्या कमी अधिक प्रमाणात झालेले आहेत. मुगाची पेरणी 1 लाख 38 हजार 853 हेक्टर म्हणजेच 35%, आणि उडीद पिकाची पेरणी 2 लाख 9 हजार 521 हेक्टर वरती झाले आहे.

विभागानुसार पेरणी :Mansoon Andaj 2024

विभाग पावसाचे प्रमाण
पुणे71. 87%
लातूर66.82%
अमरावती 52.92 टक्के
कोल्हापूर 51.32%
नाशिक 46.10 टक्के
नागपुर 34.39 टक्के
संभाजीनगर 19.65 टक्के
कोकण 3.99 टक्के
एकूण 56%

कापसाला मिळाला 8000 दर; पहा राज्यातील बाजार समिती मधील कापसाचे बाजार भाव

WhatsApp Group Join Now

Leave a Comment