Bhavantar yojana 2024 : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार द्वारा पंतप्रधान पिक विमा योजना राबवली आहे . केंद्राप्रमाणे देशातील राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे . तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे होणार नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार द्वारे पंतप्रधान पिक विमा योजना देखील राबवली जाते . केंद्राप्रमाणेच देशातील राज्य सरकारी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे . हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भावांतर भरपाई योजना राबवली जाते . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतमालाला कमी भाव मिळाला . तर भरपाई दिली जाते या लेखांमध्ये आपण भावांतर भरपाई योजना काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया .
काय आहे भावांतर योजना ? Bhavantar yojana 2024
Bhavantar yojana 2024 : हरियाणा सरकारकडून 2021 मध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने भावांतर भरपाई योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत फळ पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात त्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळाल्यास राज्य सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते . राज्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत .
भावांतर योजना जोखीम करण्याचा उद्देश काय आहे ?
राज्यातील फळ पिके उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे विक्रीनंतर होणाऱ्या नुकसानाची भरपाई साठी ही योजना चालवली जात आहे . बाजारात भाजीपाला आणि फळांचे दर कमी असतील .तेव्हा शेतकऱ्यांना निश्चित सुरक्षित किंमत देऊन त्यांची जोखीम कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे . तसेच या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या बहुपीक पद्धतीसाठी प्रोत्साहन करत आहे .
दूध उत्पादकांसाठी किसान सभा राज्यभर आंदोलन होणार दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी
Bhavantar yojana 2024 : हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री भावांतर भरपाई योजना राबवले जाते . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमाला कमी भाव मिळाल्यास भरपाई दिली जाते भावांतर भरपाई योजना आणि फळबाग विमा योजनेतून शेतकऱ्यांना ४० हजार रुपये प्रति एकर पर्यंत भरपाई मिळू शकणार आहे . दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अतिवृष्टी आणि गरिबीसह अवकाळी पावसामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जाते . जेणेकरून शेतकऱ्यांना पिकाला विमा संरक्षण मिळते केंद्राप्रमाणे राज्य सरकारचे विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहेत .
भावांतर योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो ?
योजनेच्या पहिल्या टप्प्यात, टोमॅटो कांदा, बटाटा, फ्लावर, या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे . या चार पिकांना प्रति एकर 48 हजार रुपये ते 56 हजार रुपये उत्पन्न मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे पहिल्या टप्प्यात वरील चार पिकांसाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे . यासाठी शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे . नोंदणी केली असेल तर शेतकऱ्यांना भावांतर नुकसान भरपाई योजनेअंतर्गत शेतमाल विकताना झालेले नुकसान भरून काढू शकते . (Bhavantar yojana 2024)