Free Gas cylinder Yojana 2024 राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार यांनी गॅस सिलेंडर बाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. नेमकी ही योजना काय आहे ? पहा संपूर्ण सविस्तर माहिती.
Free Gas cylinder Yojana 2024 महाराष्ट्र मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचवेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलेंडर देणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केलेली आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल तक्रारी कमी करायचे असतील तर सुरक्षित इंधन दिले पाहिजे असा विचार आहे. प्रत्येक कुटुंबांना एलपीजी गॅस प्रत्येक घरामध्ये देण्यासाठी पात्र कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देणारे अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री यांनी जाहीर करणार आहेत. या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 400 एवढा कुटुंबांना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण सुद्धा केले जाईल अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे.
राज्यात कापसाची आवक कमी, पहा बाजार समिती मधील कापसाचे बाजार भाव
सामूहिक विवाह अनुदानामध्ये वाढ :
Free Gas cylinder Yojana 2024 शुभमंगल सामूहिक विवाह योजनेमधील अनुदान या आधी दहा हजार रुपये होते परंतु यामध्ये आता अनुदानामध्ये वाढ केलेली आहे. हे अनुदान 25000 एवढं केले आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या ऐवजी नव्या रुग्णवाहिका देणार. हर घर नल, हर घर जलसाठी एक कोटी 25 लाख 66 लाख घरांना जोडणे दिली जाणार आहे.
या योजनेमध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने प्रगतीची वाटचाल सुरू केलेली आहे. यादे महिला धोरण जाहीर केले होते, परंतु त्यामध्ये वेळोवेळी बदल केले. सध्या सरकारने अष्ट सूत्रे महिला धोरण जाहीर केलेले आहे. महिलांसाठी पोषण, रोजगार, आणि कौशल्य यासाठी योजना राबवणार आहेत. यामधील एक लडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ योजना सुरू केल्या आहेत. करण्यासाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना, यासारख्या योजना राबवत आहेत. अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे.
लाडकी बहिण योजना :
समाजाचा केंद्रबिंदू हा स्त्री होत आहे. आज महिला महिला कुटुंब आणि अर्थार्जुन अशा दोन्ही पातळीवर ती काम करत आहेत. सर्व परीक्षांमध्ये मुली या अव्वल येत असतात. मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केलेली होती. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी देण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करणे सुरू केले जाणार आहे, असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे.
पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा