krushi swavlamban yojna 2024 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जाती व नवोदय शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यरत आहे या योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवोदय शेतकऱ्याचे उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे व आर्थिक परिस्थिती सुधारणे जमिनीतील ओलावा टिकून राहावा ही योजना 2016 आणि 17 पासून राबविण्यात येत आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
krushi swavlamban yojna 2024 आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या भारत देशात शेतीवर जास्त कुटुंब अवलंबून आहेत तसेच भारतातील 70 टक्के लोक हे शेती करतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतं आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतो जो शेतकरी आपल्या साठी राबवून आपल्यापर्यंत अन्नधान्य पुरवतो अशा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत पण ज्यावेळेस शेतकरी राजा हा विविध संकटात असतो जसे की गारपीट अवकाळी पाऊस कोरडा दुष्काळ ढगफुटी ओला दुष्काळ आणि पिकावर होणारे रोग यातून शेतकरी पूर्णपणे जरी घेऊन जातो पूर्ण वर्षभराचे मेहनत आणि पैसा वाया जातो अशा वेळेत शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी सरकार शेतकरी साठी सहाय्य म्हणून योजना राबवत असते .
krushi swavlamban yojna 2024 या योजनेमधून किती दिले जाते अनुदान ?
( krushi swavlamban yojna 2024 )या योजनेमधून नवीन विहीर बांधण्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जातात तसेच ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतातील जुने विहर दुरुस्त करायचे असेल तर त्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये अनुदान दिले जाते आणि ज्या शेतकऱ्याला छोट्या स्वरूपाचे इंवेल बोरिंग हवे असेल तर वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाते तसेच शेतकऱ्याला शेताच्या पाण्यासाठी पंपसंच हवा असेल तर वीस हजार रुपये अनुदान दिले जाते वीज जोडणी जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये करायचे असेल तर दहा हजार रुपये अनुदान दिले जाते आणि शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी एक लाख रुपये दिले जाते तसेच सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी पन्नास हजार ते 25 हजार दिले जातात .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थी :
- शेतकरी हा अनुसूचित जाती आणि नव बौद्ध असलेला पाहिजे
- शेतकऱ्याकडे जातीचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र असलेले पाहिजे
- ज्या अनुसूचित जातीच्या शेतकरीला नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्याकडे किमान 0.40 हे शेतजमीन असणे आवश्यक आहे
- सामायिक शेतजमीन किमान 0.40 धारण करणारी एकत्रित कुटुंब नवीन विषय घेण्यासाठी पात्र असतील
- ज्या शेतकऱ्यांना विहीर सोडून इतर घटकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे कमीत कमी झिरो पॉईंट वीस जमीन असली पाहिजे
- या योजनेसाठी जमिनीची अट किमान सहायक तर इतकी आहे
- लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असले पाहिजे .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी पात्रता:
- लाभार्थ्याकडे जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्याकडे जमिनीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे
- आठ अ चा नमुना उतारा असला पाहिजे
- शेतकरी हा नगरपंचायत आणि महानगरपालिका या क्षेत्राबाहेरचा असला पाहिजे
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते
- बँकेचे खाते हे आधार कार्ड सिलिंग असले पाहिजे
- लाभार्थ्याचे उत्पन्न एक लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावी
- तहसीलदार मी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे
- ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे
ज्या शेतकऱ्यांना स्वर्गीय दादासाहेब गायकवाड सबलीकरण व अभियान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेले असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य असेल . krushi swavlamban yojna 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
krushi swavlamban yojna 2024 जर शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लॉगिन पेजवर जाऊन क्लिक ऑन द बटन नवीन युजर येथे नोंदणी करावी लागेल त्यानंतर युजर रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करून अर्जदाराचे नाव इंग्रजी मधून टाकावी लागते .अर्जदाराचे नाव मराठीमध्ये देखील टाकता येईल त्यानंतर जिल्हा निवडावा तसेच तालुका निवडावा अर्जदार ज्या गावात राहतो ते गाव निवडावे आपल्या गावाचा पिनकोड टाकावा आपला मोबाईल नंबर टाकावा तसेच आपली युजर आयडी टाकावी. त्यानंतर नंबर आपल्या नंबर वरती ओटीपी येतो टाकावा आपली नोंदणी झालेली आहे असा एसेमेस येईल त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन झालेले असेल . अशा प्रकारे फॉर्म भरावा लागेल माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज दाखल करा यावर क्लिक करा भरलेली माहिती परत एकदा तपासून पहावे तिथे दिलेला सर्व कागदपत्रांचे योग्य ती माहिती भरावी लागते . अशा पद्धतीने अर्ज करून शेतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करू शकतो .
अशा नवनवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : surabhi computer jath
FAQ :
डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन अनुसूचित जातीतील शेतकरी घेऊ शकतात .
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना कोणत्या योजनेमार्फत जमीन वाटप केले जाते ?
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना स्वर्गीय दादासाहेब गायकवाड सबलीकरण व अभियान योजनेअंतर्गत जमीन वाटप केले जाते .