50000 anudan 2024 राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 50000 रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र परंतु तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी सुरुवात झालेली आहे.
राज्य सरकारने त्यावेळी माहिती मागवली असून दोन दिवसांमध्ये जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. यानुसार सुमारे 22,000 शेतकऱ्यांना 25 हजार रुपये पर्यंत लाभ मिळू शकतो. केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ योजनेअंतर्गत राज्य सरकारने 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती.
50000 anudan 2024 यामध्ये शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान आणि 50,000 यांच्या वरील थकीत पीक कर्जासाठी ओटीएस योजना राबवली होती.जिल्ह्यामधील एक लाख 97 हजार 596 खातेदार शेतकऱ्यांना 373 कोटी 81 लाख 70 हजार रुपयांचा लाभ दिला होता. राज्यामध्ये 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली.
या योजनेमध्ये 2 लाख पर्यंत थकीत कर्ज माफ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळाले आहे. सरकारने शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये वंचित शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे.
एका तरुण शेतकऱ्यांची कमाल..! भाजीपाला रोपे विक्रीतून लाखोंची कमाई
सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थांकडून या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. सोमवार पर्यंत ही माहिती सहकार विभागाला त्याचे नियोजन बँकेचे असून या दृष्टीने सूचनाही संबंधितांना दिलेले आहेत. विधानसभा आचारसंहितेपूर्वी या वंचित शेतकऱ्यांना लाभ देता येईल का ? याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.Karj Mafi Yojana 2024
50000 anudan 2024 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 :
- कर्जमाफीचे खाते 20,282
- रक्कम 71.18 कोटी
- प्रोत्साहन खातेदार 1,76,036
- रक्कम 286 .19 कोटी
- ओटीएस पात्र खातेदार 1,278
- रक्कम 16.43 कोटी
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 :
- कर्जमाफीचे खातेदार 47,839
- रक्कम 285.12 कोटी
- प्रोत्साहन खातेदार 1,77,789
- रक्कम 646.36 कोटी
राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता